AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amsha Padvi : शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, कोण आहेत आमशा पाडवी?

Amsha Padvi : आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे.

Amsha Padvi : शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, कोण आहेत आमशा पाडवी?
शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, कोण आहेत आमशा पाडवी?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2022 | 11:12 AM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असतानाच विधानपरिषदेची निवडणूकही (Maharashtra Legislative Council) लागली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांना तिकीट देण्यात येणार आहे. तर शिवसेनेकडून नंदूरबारचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी (Amsha Padvi) आणि शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सचिन अहिर यांना शिवसेना आज ना उद्या सत्तेत संधी देणार हे निश्चित होतं. त्यामुळे अहिर यांचा विधान परिषदेसाठी विचार होणार असल्याची चर्चा होतीच. पण शिवसेनेने आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिवसेनेने राज्यसभेत संजय पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत सामान्य शिवसैनिकांचा सन्मान होत असल्याचं दाखवून दिलं आहे. आताही आमशा पाडवी यांना विधान परिषद देऊन त्याचीच पुनरावृत्ती केली आहे.

कोण आहेत आमशा पाडवी?

आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.

म्हणून उमेदवारी

नंदूरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून नंदूरबारमधून काँग्रेसची राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांनी विश्वास ठेवला

मी शिवसेनेत सुरुवातीपासून काम करत आहे. त्याची आज कदर झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी मला तिकीट दिलं. हे माझं भाग्यच आहे. काल मला शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन आला. त्यांनी मला फोन करून याबाबतची काल माहिती दिली. आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांनीही मला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आज मी मुंबईत आलो आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं पाडवी यांनी सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.