‘भोर म्हणजे थोपटे’ आणि ‘थोपटे म्हणजे भोर’; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर

सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. (Sangram Thopte)

'भोर म्हणजे थोपटे' आणि 'थोपटे म्हणजे भोर'; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर
Sangram Thopte
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 7:43 AM

मुंबई: सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे. संग्राम थोपटे यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (know about congress leader and mla Sangram Thopte)

‘भोर म्हणजे थोपटे’

संग्राम नारायण थोपटे हे 38 वर्षाचे आहेत. ऐन तरुण वयातच त्यांना विधानसभेवर जाता आलं. त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. पुण्यातील भोर हा त्यांचा विधानसबा मतदारसंघ. बीएपर्यंत शिक्षण घेतलेले थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. भोरमध्ये गेल्या चार दशकांपासून थोपटे पितापुत्रांची सत्ता आहे. ‘भोर म्हणजे थोपटे’ व ‘थोपटे म्हणजे भोर’ हे समीकरण झालेलं आहे. चौरंगी लढत असो की थेट सामना असो… थोपटे यांनी प्रत्येक आव्हान पलटवून लावलं आहे.

वडील सहावेळा आमदार

2009मध्ये झालेल्या परिसीमनानंतर ‘भोर-वेल्हा-मुळशी’ हा मतदारसंघ अस्तित्वात आला. महाडच्या सीमेवरील वरंधा घाटापासून हा मतदारसंघ सुरू होतो. वेल्ह्यातील मढे घाट, लवासा ते मुळशीतील ताम्हिणी घाटापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर दऱ्यांतील वस्ती, 7 मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगलाखालील क्षेत्राची मोठी व्याप्ती असा हा मतदारंसघ आहे. 1999मधील ‘राष्ट्रवादी’चा अपवाद वगळता मतदारसंघाने कायम काँग्रेसला किंबहूना थोपटे कुटुंबाला साथ दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे 6 वेळा नेतृत्व केले.

मोदी लाटेतही मतदारसंघ राखला

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व असतानाही संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघ राखला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्यांनी मतदारसंघ बांधून ठेवला. केवळ विधानसभा मतदारसंघच नाही, तर भोरची नगरपालिका, साखर कारखाना आणि तालुक्यातील इतर संस्थांमधील सत्ताही त्यांनी राखल्या आहेत.

निलंबनाची कारवाई

22 मार्च 2017मध्ये अर्थमंत्र्याने अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, हा अर्थसंकल्प कूचकामी असल्याचं सांगत थोपटे यांच्यासह काही आमदारांनी अर्थसंकल्पाच्या प्रतींची विधानभवनाबाहेर होळी केली होती. त्यामुळे थोपटे यांच्यासह 18 आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

मंत्रिपदाची इच्छा होती, मंत्रिपद हुकलं

ठाकरे सरकारमध्ये आपली वर्णी लागेल असं थोपटे यांना वाटत होतं. सलग तीनवेळा ते पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना मंत्री होऊ असं वाटत होतं. तशी कबुलीही त्यांनी दिली होती. तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, असं थोपटे म्हणाले होते.

मंत्रिपद न मिळाल्याने थेट पक्ष कार्यालयच फोडलं

संग्राम थोपटे हे तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण यावेळीही त्यांचं मंत्रिपद हुकलं. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेस भवन या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. थोपटे समर्थकांनी काँग्रेस भवनातील खुर्च्यांची तोडफोड केली होती. त्यावर तोडफोड ही काँग्रेसची परंपरा नाही. कोणी दगडफेक केली, याची वस्तुस्थिती तपासली पाहिजे. हे कार्यकर्ते शहरातले आहेत की ग्रामीण भागातील आहेत, हे तपासावे लागेल. त्याचबरोबर आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणाचं कटकारस्थान आहे का, याचाही शोध घेत असल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं होतं.

20 नगरसेवकांचे राजीनामे

थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज समर्थकांनी केवळ काँग्रेस कार्यलायाची तोडफोड केली नाही. तर भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी पदाचे राजीनामे दिलो होते. भोर मतदारसंघातील काँग्रेस कमिटीच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे देत समित्या बरखास्त केल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना हस्तक्षेप करून ही नाराजी दूर करावी लागली होतं.

विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत

दरम्यान, संग्राम थोपटे यांची विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नावासाठी सध्या चर्चा सुरू आहे. थोपटे यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचं बळ वाढवून राष्ट्रवादीला शह देण्यासाठी थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं, असं जाणाकार सांगतात.

कोण आहेत संग्राम थोपटे?

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत

ते पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात

संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना होती

मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केली होती

1952पासून भोरचे आमदार

मामासाहेब मोहोळ (काँग्रेस) कॉ. जयसिंग माळी (लाल निषाण पक्ष) शंकरराव भेलके (काँग्रेस) संपतराव जेधे (अपक्ष) अनंतराव थोपटे (काँग्रेस-सहा वेळा) काशिनाथराव खुटवड (राष्ट्रवादी कॉग्रेस) संग्राम थोपटे (काँग्रेस-तीन वेळा) (know about congress leader and mla Sangram Thopte)

संबंधित बातम्या:

दोनदा पडला तरीही लढला, तिसऱ्यांदा पठ्ठ्या जिंकलाच; जिद्द आणि संघर्ष म्हणजे समाधान आवताडे!

ठाकरे घराण्यातील पहिला आमदार; शिवसेनेतील तेजस्वी युवापर्व; जाणून घ्या, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास!

पानटपरी चालक ते मंत्री; गुलाबराव पाटलांबाबत हे माहीत आहे का?

(know about congress leader and mla Sangram Thopte)

शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई.
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.