Special Report: ‘भजन रुम’मध्ये टॉर्चर, सिलिंडर खालून भुयारी मार्ग; दगडी चाळ अंडरवर्ल्डचा अड्डा कशी बनली? वाचा सविस्तर

'परिंदा भी पर मार नही सकता...' अशी दहशत आणि जरब असलेली आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या नावाने ओळखली जाणारी दगडी चाळ लवकरच जमीनदोस्त होणार आहे. (know about Gangster Arun Gawli fortress Dagdi Chawl)

Special Report: 'भजन रुम'मध्ये टॉर्चर, सिलिंडर खालून भुयारी मार्ग; दगडी चाळ अंडरवर्ल्डचा अड्डा कशी बनली? वाचा सविस्तर
arun gawli
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 8:16 PM

मुंबई: ‘परिंदा भी पर मार नही सकता…’ अशी दहशत आणि जरब असलेली आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या नावाने ओळखली जाणारी दगडी चाळ लवकरच जमीनदोस्त होणार आहे. बड्या गँगस्टरने गजबजलेली… अनेक दंतकथा, अख्यायिकांनी नेहमीच गूढ बनून राहिलेली ही दगडी चाळ नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी काळी या दगडी चाळीचा प्रचंड दरारा होता, तो इतका की पोलीसही दगडी चाळीत जायला घाबरायचे. आता ही दगडी चाळ जमीनदोस्त होऊन त्या ठिकाणी मोठे टॉवर उभे राहणार आहेत. त्याचबरोबर दगड चाळीशी जोडलेला कुप्रसिद्ध इतिहासही जमीनदोस्त होणार आहे. (know about Gangster Arun Gawli fortress Dagdi Chawl)

म्हाडाने लेटर ऑफ कंटेट जारी केलं आहे. त्यानुसार दगडी चाळीचा बिग टाऊनशीप प्लानमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार दगडी चाळ येत्या काही दिवसांमध्ये पाडली जाणार आहे. दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश यात आहे. या दगडी चाळीच्या जागी आता 40 मजली टॉवर उभारला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

चाळीचं खास वैशिष्ट्ये

ही चाळ 120 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पंधारे हे या चाळीचे सुरुवातीचे मालक होते. या चाळीचं खास वैशिष्ट्ये म्हणजे या चाळीत सर्वजण वन रुम किचनच्या खोलीत राहत होते. याच चाळीत अरुण गवळी यांचंही स्वतंत्र घर होतं. या चाळीसमोर मोठं मैदान आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव भरतो. दगडी चाळीचा नवरात्रोत्सव दक्षिण मुंबईत आजही प्रसिद्ध आहे. याच मैदानात महिला पापड वाळत घालायच्या. मुलं क्रिकेट खेळाची. आता या मोकळ्या जागेवरही टॉवर्स येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी श्रीमंत लोक राहायला येणार असून अनेक नवे चेहरेही दिसणार आहेत. परिणामी दगडी चाळीचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे.

8 इमारतींची 2 कोटीला खरेदी

1970-80च्या दशकात या चाळीत मिल कामगार राहत होते. या दगडी चाळीत एकूण दहा इमारती आहेत. यातील दोन इमारतीत अरुण गवळीचं घर आहे. इतर आठ इमारती अरुण गवळीने 2002मध्ये दोन कोटीला खरेदी केल्या होत्या. त्यानंतर गवळीने राजकारणात प्रवेश केला. त्याने अखिल भारतीय सेना नावाच पक्षही काढला. विशेष म्हणजे गवळी निवडून येऊन आमदारही झाला. त्याची कन्याही नगरसेविका आहे.

अंडरवर्ल्डचा अड्डा बनली

70-80च्या दशकात अरुण गवळी याच चाळीतून आपली गँग चालवायचा. त्याकाळी दगडी चाळीची संपूर्ण मुंबईत दहशत होती. या चाळीत जाणारा व्यक्ती चाळीतील भुलभुलैय्यामध्ये अडकून जात होता. या चाळीत राहणारा प्रत्येक व्यक्ती गवळीची पाठराखण करणारा आहे. या चाळीची दहशत प्रचंड होती. कधी काळी पोलीसही या चाळीत जायला घाबरायची. एखाद्या वेळी पोलीस आलेच चाळीत तर चाळीतील महिला पदर खोवून चाळीच्या तोंडावर यायच्या. मुलं प्रचंड गोंधळ घालायची. पोलिसांना जेरीस आणून पळवून लावण्याचा हा प्रकार असायचा. त्यामुळे या गोंधळाचा फायदा उचलून गवळी गायब व्हायचा. त्यामुळे गवळी न सापडल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी जावं लागायचं.

सिलिंडरखालून रस्ता, भजन रुम

या ठिकाणी लपून राहण्यासाठी गवळीने एक खास रुम तयार केला होता. चाळीतील तळमजल्यावरील काही घरातून एक अंडरग्राऊंड रस्ता तयार करण्यात आला होता. किचनमधून या खास रुममध्ये जाता येत होतं. किचनमध्ये एक गॅस सिलिंडर ठेवलेला होता. त्याखाली भुयारी मार्ग होता. सिलिंडर हटवताच या भुयारी मार्गातून थेट खास रुममध्ये जाता येत होतं. पोलीस आणि शत्रू टोळ्यांपासून बचाव करण्यासाठी गवळीने हा भुयारी मार्ग तयार केला होता. त्याशिवाय गवळीचा आणखी एक खास रुम होता. त्याला ‘सेटलमेंट रुम’ म्हटलं जायचं. तसेच याला ‘भजन रुम’ही म्हटलं जायचं. या रुमला ‘टॉर्चर रूम’ही संबोधलं जात होतं. याच ठिकाणी बिल्डरांना डांबून ठेवून त्याच्याकडून खंडणी वसूल केली जात होती. ऐकलं नाही तर थर्ड डिग्रीचा वापर केला जात असे. या भजन रुममध्ये हाडे खिळखिळी होत असल्याने बिल्डर आणि राजकारण्यांमध्येही प्रचंड दहशत होती, असं सांगतात.

अरुण गुलाब अहिर बनला डॅडी

अरुण गुलाब गवळीचं खरं नाव अरुण गुलाब अहिर असल्याचं सांगितलं जातं. पण अंडरवर्ल्डमध्ये अरुण गवळी या नावानेच गवळी फेमस आहे. शिवाय त्याला चाळीतील लोक डॅडी नावानेही संबोधतात. अरुण गवळी हा त्याचा भाऊ किशोर (पप्पा) मुळे 70च्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये आला. तेव्हा भायखळा आणि परळ भागात रमा नाईक आणि बाबू रेशीम यांची दहशत होती. या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर गवळी एका कंपनीत भरती झाला. 1988मध्ये रमा नाईक एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर गवळीने नाईकच्या गँगवर कब्जा केला आणि दगडी चाळीतून गँग चालवायला सुरुवात केली. बघता बघता गवळीनेही आपली दहशत निर्माण केली आणि संपूर्ण मुंबईत गवळी गँग फोफावली. 1980 ते 1990पर्यंत गवळी गँगचा दाऊद गँगसोबत राडा व्हायचा. दाऊदचाही मुंबईत दरारा होता. मात्र, दाऊदचे गुंडही दक्षिण मुंबईत यायला घाबरायचे, इतकी गवळीची दहशत होती.

मध्यप्रदेशातील खंडवातून आले

अरुण गवळीचे वडील मध्यप्रदेशातील खंडवातून आल्याचं सांगितलं जातं. 1970-80 च्या दशकात गवळी मिलमध्ये काम करायचा. तसेच दूध विक्रीचाही धंदा करायचा. 1980च्या सुमारास मुंबईत गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. बराच काळ हा संप चालला. त्यामुळे गिरण्या बंद पडल्या. अनेक लोक बेकार झाले. गवळीने यातील अनेक बेरोजगारांना आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतले. दगडीचाळीत मोठमोठे बिल्डर वाद घेऊन येत. गवळी त्यांचा निवाडा करत असे. त्याबदल्यात त्याला बराच पैसा मिळत असे.

सोफा हलला अन्…

पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी गवळी कधीच एका जागी थांबत नसे. 1989मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेही वेगळ्याच ठिकाणाहून. गवळी लाल गाडीतून दगडी चाळीत आल्याची गुप्त खबर आयपीएस अधिकारी अरविंद एस. इनामदार यांना मिळाली होती. ते त्यावेळचे पोलीस निरीक्षक सुरेश वालीशेट्टीसह एक टीम घेऊन दगडी चाळीत घुसले. तेव्हा त्यांना दगडी चाळीत सहा वॉन्टेड गुंड सापडले, पण गवळी काही सापडला नाही. त्याचवेळी वालीशेट्टी यांना एक लाल रंगाची गाडी दिसली. त्यामुळे गवळी चाळीतच असल्याची खबर पक्की असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण दगडी चाळ शोधली. पण गवळी काही सापडला नाही. मात्र, एका खोलीत पोलिसांना सोफा हलताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी हा सोफा उघडून पाहिला असता अरुण गवळी त्यात झोपलेला आढळला.

राजकारणात प्रवेश, जन्मठेप

कालांतराने अंडरवर्ल्डचा दरारा कमी झाल्यानंतर 2000मध्ये गवळीने अखिल भारतीय सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्याने या सेनेचा आझाद मैदानात भव्य मोर्चाही काढला. विशेष म्हणजे त्याच्या पक्षाच्या तिकीटावर तीन नगरसेवकही निवडून आले. तसेच स्वत: गवळीही आमदार झाला. मात्र, राजकारण करतानाच अंडरवर्ल्डचं कामही त्याने सुरू ठेवलं. त्यानंतर शिवसेना नगरसेवक प्रकाश जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला अटक करण्यात आली. त्याला जन्मठेप सुनावण्यात आली. सध्या गवळी नागपूर जेलमध्ये असून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. (know about Gangster Arun Gawli fortress Dagdi Chawl)

संबंधित बातम्या:

Dagdi Chawl | डॉन अरुण गवळीची ‘दगडी चाळ’ जमीनदोस्त होणार

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

डॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं

(know about Gangster Arun Gawli fortress Dagdi Chawl)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.