किस्से निवडणुकीचे: एका जागेसाठी हजार उमेदवार, आयोगाने बॅलेट पेपर नव्हे ‘बॅलेट बुकच’ छापले!
आजवरच्या निवडणूक इतिहासात सर्वाधिक चर्चिली गेलेली निवडणूक ठरली होती. सर्वाधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा निवडणुका ‘ईव्हीएम’ ऐवजी बॅलेट पेपरवर लढविल्या जात होत्या. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या इतकी अमाप होती की, निवडणूक आयोगाला चक्क बॅलेट पेपरऐवजी ‘बॅलेट बुक’ छापावे लागले.
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly Election 2022) निवडणुकींच्या तारखांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय पक्षांसोबत प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवारांची मोठी भाऊगर्दी असते. प्रत्येक निवडणुकीची वेगळीच कहाणी असते. तमिळनाडू विधानसभा (TamilNadu) निवडणुकीत एका जागेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला (Election Commission) मतदानाची तारीख लांबणीवर टाकावी लागली होती. आजवरच्या निवडणूक इतिहासात सर्वाधिक चर्चिली गेलेली निवडणूक ठरली होती. सर्वाधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा निवडणुका ‘ईव्हीएम’ ऐवजी बॅलेट पेपरवर लढविल्या जात होत्या. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या इतकी अमाप होती. निवडणूक आयोगाला चक्क बॅलेट पेपरऐवजी ‘बॅलेट बुक’ छापावे लागले. जाणून घेऊया- तमिळनाडूच्या ‘त्या’ निवडणुकीची रंजक शब्दसफर!
कोणत्या मतदारसंघाची निवडणूक?
वर्ष 1996. तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत होते. मोदाकुरिची मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली. उमेदवारांची सर्वाधिक संख्या देशात चर्चेचं कारण ठरलं. एका जागेसाठी 100-200 नव्हे तर एक हजारांहून अधिक उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केला होता. मोदाकुरिची जागेवर 1033 उमेदवार रिंगणात होते. मोठ्या संख्येने नामांकन आल्यावर निवडणूक आयोगच बुचकळ्यात पडले होते. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा हक्क असल्याने आयोगाने हात टेकले. यशस्वी निवडणुका पार पाडणाऱ्या आयोगाने चक्क निवडणूक एक महिन्याने पुढे ढकलली होती.
बॅलेट पेपर नव्हे बॅलेट बुकच!
‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, मोठ्या संख्येने उमेदवारांना मत देण्याची व्यवस्था कशी करावी हाच प्रश्न आयोगासमोर होता. निवडणूक आयोगानं हार मानली नाही. एका बॅलेट पेपरवर 1033 उमेदवारांची नाव छापली. एरवी 1-2 पानांचा असलेला बॅलेट पेपर चक्क बॅलेट बुक ठरला होता. उमेदवारांची चक्क नाव शोधून त्यांना मतदान करावे लागले होते. उमेदवारांची नावचं इतकी म्हटल्यावर शोधण्यासाठी वेळ लागणारच. म्हणून निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ वाढविली होती. मतदान पेटीचा आकार वाढवला होता. जेणेकरुन बॅलेट सहजपणे आत टाकले जावे.
शून्य मतांचा विक्रम
उमेदवारांच्या संख्येमुळे गाजलेल्या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. निवडणुकीत तब्बल 88 उमेदवारांना मतांचा भोपळाही फोडता आली नाही. 158 उमेदवारांना चक्क एक मत मिळाले.
जागा एक, उमेदवार हजार कशासाठी?
देशात किसान आंदोलनाची चर्चा होती. केंद्र सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पावलं उचलल्याची चर्चा होती. त्यामुळे तत्कालीन किसान आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत दंड थोपटले होते.
संबंधित बातम्या
आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे! जाणूण घ्या कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला काय नाव?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो गायब, गणपतीबरोबर फक्त राणे
मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?