पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, ‘मामांची कृपा?’; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राज्यातील तरुण मंत्री आणि आमदार आहेत. (know all about Minister of state Prajakt Tanpure political journey)

पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, 'मामांची कृपा?'; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?
प्राजक्त तनपुरे
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 7:22 PM

मुंबई: राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राज्यातील तरुण मंत्री आणि आमदार आहेत. राजकीय घराण्यातून आलेल्या तनपुरे यांना पहिल्यांदाच आमदार होताच मंत्रीपदाची लॉटरी लागली. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे त्यांना हे पद मिळाल्याचं सांगण्यात येतं. प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कारकिर्द कशी आहे? त्याचा घेतलेला हा आढावा. (know all about Minister of state Prajakt Tanpure political journey)

अमेरिकेत शिक्षण

प्राजक्त तनपुरे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1976 रोजी झाला. त्यांनी बी. ई., एमबीए, एमएस या पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. ते प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत.

नगरपरिषदेतून राजकारणाला सुरुवात

प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाला. नगरपरिषदेच्या राजकारणापासून त्यांच्या राजकारणा सुरुवात झाली. ते जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लावले. उच्च शिक्षित असलेल्या तनपुरे यांचा ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचा अभ्यास आहे. उत्कृष्ट संघटक म्हणूनही ते राहुरीत प्रसिद्ध आहेत. तरुणांना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.

घरातच राजकारण

प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि नगराध्यक्षा उषा तनपुरे यांचे पूत्रं आहेत. प्रसाद तनपुरे हे 25 वर्षे आमदार होते आणि पाच वर्षे खासदार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांचे अत्यंत जवळचे असूनही प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकली नव्हती. प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबुरावदादा तनपुरे हे दहा वर्षे आमदार होते. त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. आजोबांपासून घरातच राजकारण असल्याने प्राजक्त तनपुरे यांच्यावर राजकारणाचं बालकडू लहानपणापासूनच मिळालं होतं. त्यामुळे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी नोकरी वगैरे केली नाही. तर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय योग्य ठरला.

मामांची कृपा

प्रसाद तनपुरे यांच्या आई उषा तनपुरे या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भगिणी आहे. त्यामुळे पाटील यांनी आपले भाचे प्राजक्त यांना विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते नगरच्या राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले. ही त्यांची पहिलीच निवडणूक होती आणि या पहिल्याच निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळालं. ते विजयी झाले. त्यांनी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा 23 हजार मतांनी पराभव केला आणि मामांच्या कृपने राज्याच्या मंत्रिमंडळातही आले. ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री आहेत.

पहिल्यांदाच मंत्रिपद

तनपुरे यांचं घराण्याची ही तिसरी पिढी राजकारणात आहे. आजोबा दोनदा आमदार, वडील पाचवेळा आमदार असूनही घरात मंत्रिपद आलं नाही. मात्र, प्राजक्त हे पहिल्यांदाच आमदार झाले आणि पहिल्याच झटक्यात राज्यमंत्रीही झाले. त्यांच्याकडे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. (know all about Minister of state Prajakt Tanpure political journey)

संबंधित बातम्या:

प्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी!

शिवसेना ते शिवसेना, व्हाया राष्ट्रवादी; असा आहे भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास!

बिनधास्त बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही; वाचा, सविस्तर

(know all about Minister of state Prajakt Tanpure political journey)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.