वाशिम जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची माहिती फक्त एका क्लिकवर
अखेर वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झालीय. वाशिम जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील 14 जिल्हा परिषद सदस्यांच्या रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे.
वाशिम : अखेर वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झालीय. वाशिम जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील 14 जिल्हा परिषद सदस्यांच्या रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. एकाच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे (Know all about time table of Washim ZP Election declared by Election commission).
वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते. मात्र घोषित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावनी होऊन उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारणीला मुदतवाढ दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचिका दाखल करून घेत न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे आदेश आयोगाला दिले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरवल्यानंतर निवडणुकांची घोषणा
यानंतर आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या होत्या. दरम्यान या याचिकेवरील सुनावनी सुरुच होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मागास प्रवर्गातील जागावरील निवडणूका रद्द ठरवल्या. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील 2 आठवडयात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश दिले होते. आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोणत्या जागांवर निवडणूक?
जिल्हा परिषदेमधील एकूण 52 जागा पैकी 14 जागांवर निवडणूक होत आहे काटा , पार्डी टकमोर, उकळी पेन,पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, भामदेवी, कुपटा, फुलउमरी, आसेगाव, तळप,या गटांचा समावेश आहे.
असा आहे कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 29 जुन ते 5 जुलै पर्यंत मुदत असणार आहे. 6 जुलैला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. 19 जुलैला मतदान होणार असून 20जुलैला निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.
पंचायत समितीचीही निवडणूक
या जिल्हा परिषद निवडणूकीबरोबर जिल्ह्यातील 19 जागांचीही पोटनिवडणूक होत आहे.या गणांमधे अनेक पदाधिकारी पदमुक्त झाले होते.या ठिकाणीही निवडणूक होणार असल्याने ग्रामीण भागात वातावरण तापले आहे.
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम – 14 नागपूर – 16
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे – 30 नंदूरबार – 14 अकोला – 28 वाशिम – 27 नागपूर – 31
हेही वाचा :
सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर
पंकजा मुंडे, वडेट्टीवार म्हणाले, निवडणुका होऊ देणार नाही, आता 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर
व्हिडीओ पाहा :
Know all about time table of Washim ZP Election declared by Election commission