अजित पवार यांना पहिला झटका, ‘ते’ खातं नाही मिळणार?, ‘या’ नेत्याच्या खात्यावर गंडांतर; असे असेल संभाव्य खातेवाटप
राज्यात नवीन समीकरणे आकाराला आली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एकूण 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे या मंत्र्यांना कोणतं खांत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अजितदादा यांना महत्त्वाचं खातं दिलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात असतानाच अजितदादांना पहिलाच मोठा झटका बसला आहे. अजितदादा यांना अपेक्षित खातं मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या तीव्र विरोधामुळे अजितदादांना महत्त्वाचं खातं मिळणार नसल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना महत्त्वाचं खातं दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. अजितदादा यांना अर्थखातं तरी दिलं जाईल अशी शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात वेगळच घडताना दिसत आहे. अजितदादा यांना अर्थ खातं देऊ नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांनी जोर लावला आहे. या आमदारांनी अजितदादांच्या या खात्याला विरोध केला आहे. त्यामुळे अजितदादा यांना महसूल खातं दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विरोध का?
अजितदादा पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. त्यावेळी अजित पवार यांनी निधी दिला नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. निधी मिळत नसल्यानेच आम्ही शिवसेना सोडत असल्याचंही शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता होऊ नये म्हणून शिंदे गटाने अजितदादा पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विखेंचं वजन घटणार
सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खातं आहे. त्यांच्याकडचं महसूल खातं हे अजित पवार यांना दिली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अजितदादा यांना महसूल खातं दिल्यास विखे पाटील यांचं मंत्रिमंडळातील महत्त्व कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विखे पाटील नाराज होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कुणाला कोणती खाती मिळणार?
अजित पवार – महसूल
दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी
छगन भुजबळ – ओबीसी आणि बहुजन विकास
हसन मुश्रीफ – अल्पसंख्याक आणि कामगार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
धर्मराव बाबा- आदिवासी कल्याण
आदिती तटकरे – महिला आणि बालविकास