पानटपरी चालक ते मंत्री; गुलाबराव पाटलांबाबत हे माहीत आहे का?

ठाकरे सरकारमधील सध्याचा आक्रमक शिवसैनिक म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ओळखले जातात. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. (Gulabrao Patil)

पानटपरी चालक ते मंत्री; गुलाबराव पाटलांबाबत हे माहीत आहे का?
Gulabrao Patil
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:32 PM

मुंबई: ठाकरे सरकारमधील सध्याचा आक्रमक शिवसैनिक म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ओळखले जातात. गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा मंत्रिपदाचा प्रवास रंजक आहे. एक साधा पानटपरीवाला ते थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मुसंडी मारली आहे. मात्र, हा पल्ला गाठताना त्यांना प्रचंड संघर्षही करावा लागला आहे. गुलाबरावांच्या याच संघर्षावर टाकलेला हा प्रकाश. (know details of gulabrao patil’s political journey)

बाळासाहेबांनी मंत्री बनवलं

गुलाबराव पाटील हे बहुतेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो, पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण सांगतात. साधा पण आक्रमक, सरळ आणि निष्ठावान शिवसैनिक अशी गुलाबराव पाटलांची ओळख.

‘नशीब’ पानटपरी

गुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आला. गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.

तमाशात कामंही केली

गुलाबराव पाटील यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. गरीबी नुसती पाहिली नाही तर अनुभवली आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत तमाशात कामं केली. जळगाव नजीकच्या पाळधीत पान टपरीही चालवली. त्याची जाणीव त्यांना अजूनही आहे. त्यामुळेच आजही ते मंत्री असोत नसोत, लोकांच्या मदतीला धावून जातात. विभागातील विकास कामांपासून ते कौटुंबीक कलहापर्यंतच्या समस्या त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. लोकांची कायम वर्दळ असते. गुलाबराव पाटीलही जमेल तेवढी आणि शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

शिंगाडे मोर्चा गाजला

गुलाबरावांची आंदोलने हटकी राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्नावर तर त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. त्यांच्या याच आंदोलनामुळे ते लोकप्रिय झाले. अफाट वक्तृत्वामुळे त्यांना खानदेशची मुलुख मैदानी तोफ आणि शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाऊ लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य झाले. तर 1997मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009चा अपवाद वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले.

मंत्री असूनही मुलगा नोकरीला

गुलाबराव पाटील चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. पण त्यांनी कधी कुटुंबासाठी पदाचा लाभ घेतला नाही. घराणेशाहीला फिरकू दिलं नाही. मुलांनाही सत्तेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांचा मुलगा आजही घर चालवण्यासाठी नोकरी करतो. पत्नी शेतात राबते.

गुलाबराव पाटील राजकीय कारकीर्द

1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले 2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी 2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड 2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी 2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज 2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय जानेवारी 2020 – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी (know details of gulabrao patil’s political journey)

संबंधित बातम्या:

पत्रकार ते आमदार, कशी आहे कपिल पाटील यांची राजकीय वाटचाल?; वाचा सविस्तर!

मतदारांच्या ‘कार्यसम्राट आमदार’; वाचा, कसा आहे मोनिका राजळेंचा राजकीय प्रवास!

अन् सासऱ्यांचीही कोंडी झाली… नेमकं काय घडलं?; वाचा राजकारणातले ‘संग्राम’ जगताप!

(know details of gulabrao patil’s political journey)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.