Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीपद महाराष्ट्रात, लक्ष गुजरातवर; विजयकुमार गावितांच्या मंत्रिपदामागची नेमकी खेळी काय?

Maharashtra Cabinet Expansion : विजयकुमार गावित यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं म्हणून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातच्या निवडणुकीत आदिवासी मतदार वळवण्यासाठी गावित यांचा फायदा होऊ शकतो.

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीपद महाराष्ट्रात, लक्ष गुजरातवर; विजयकुमार गावितांच्या मंत्रिपदामागची नेमकी खेळी काय?
मंत्रीपद महाराष्ट्रात, लक्ष गुजरातवर; विजयकुमार गावितांच्या मंत्रिपदामागची नेमकी खेळी काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:57 PM

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) भाजप नेते विजयकुमार गावित (vijay kumar gavit) यांनाही मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांना नेमकं कोणतं खातं दिलं जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चर्चेत नसतानाही गावित यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, गावित यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपची (bjp) सुनियोजित खेळी आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावित यांना मंत्रिपद दिलं असल्याची सध्या चर्चा आहे. गावित हे आदिवासी समाजातून येतात. गुजरातमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी गावित यांचा फायदा होऊ शकतो, म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

विजयकुमार गावित यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आदिवासी समाजात जल्लोष केला जात आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला समोर ठेवून गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याचं सांगितलं जातं. गुजरातच्या बारडोली आणि सुरत भागातील आदिवासींना मोबिलाइज करण्यासाठी गावित यांचा फायदा होऊ शकतो, याच उद्देशाने गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी विजयकुमार गावित यांची वर्णी लावली आहे, असे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

सीआर पाटील यांची मध्यस्थी?

विजयकुमार गावित यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं म्हणून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातच्या निवडणुकीत आदिवासी मतदार वळवण्यासाठी गावित यांचा फायदा होऊ शकतो. त्यांना निवडणूक काळात बारडोली आणि सूरत भागात फिरवता येऊ शकतं. त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून पाटील यांनी प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फायदा झाला

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रचारासाठी विजयकुमार गावित यांची कन्या, खासदार डॉ. हिना गावित या सहभागी झाल्या होत्या. महिला खासदार म्हणून हिना गावित यांनी मुर्मू यांच्यासोबत संपूर्ण देशात भ्रमण केलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आदिवासी खासदारांना एकत्रित करण्यात हिना गावित यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही गावित बापलेकींना आदिवासी भागात प्रचारासाठी नेण्याची भाजपची योजना आहे. त्यामुळेच विजयकुमार गावित यांना मंत्रिपद देऊन बळ देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.