Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

मुख्यमंत्री उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही उद्या कोकण दौरा जाहीर करण्यात आलाय.

Kokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये
नारायण राणे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:37 PM

मुंबई : कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 43 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजून 45 लोक बेपत्ता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील विदारक स्थितीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही उद्या कोकण दौरा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत. (CM Uddhav Thackeray,  Narayan Rane, Devendra Fadnavis on a visit to Konkan on Sunday)

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार माजला आहे. संपूर्ण बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे. मात्र, ते करत असताना आपलं सर्वस्व गमावल्याचं चिपळूणकरांना पाहायला मिळत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री चिपळूणला पोहोचतील. तिथे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंही कोकण दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेही उद्या कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहे. राणेंच्या मंत्रालयाकडून तसा कार्यक्रमा जाहीर करण्यात आला आहे. नारायण राणे आज रात्री 8.50 वाजता दिल्लीवरुन मुंबईला पोहोचतील. त्यानंतर ते उद्या सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने तळई गावची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. दुपारी 12 वाजता रायगडवरुन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नुकसानाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता ते खेडवरुन चिपळूणला पोहोचतील आणि पुढे रत्नागिरीकडे रवाना होतील. यावेळी राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही असणार आहेत.

रामदास आठवलेही तळई गावाला भेट देणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उद्या तळई गावातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तशी माहिती आठवले यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या राज्यातील 4 मोठे आणि महत्वाचे नेते कोकणच्या पाहणी दौऱ्यावर असणार आहेत.

संबंधित बातम्या :

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत

CM Uddhav Thackeray, Narayan Rane,  Devendra Fadnavis on a visit to Konkan on Sunday

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.