Eknath Shinde : शिंदेंच्या बंडाला सर्वात आधी पाठिंबा, कोल्हापुरातील ‘त्या’ चार नेत्यांना मंत्रिपद मिळणार?

Eknath Shinde : कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. प्रकाश आबिटकर हे कोल्हापुरातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत.

Eknath Shinde : शिंदेंच्या बंडाला सर्वात आधी पाठिंबा, कोल्हापुरातील 'त्या' चार नेत्यांना मंत्रिपद मिळणार?
शिंदेंच्या बंडाला सर्वात आधी पाठिंबा, कोल्हापुरातील 'त्या' चार नेत्यांना मंत्रिपद मिळणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 1:12 PM

मुंबई: शिवसेनेविरोधात (shivsena) बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी भाजपच्या साथीने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात अडीच वर्षानंतर नवं सरकार आल्यानंतर भाजपमधील आमदारांच्या जशा मंत्रिपदासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत, तशाच शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोरांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. बंड केल्यानंतर मतदारसंघात पुढच्यावेळी निवडून यायचे असेल तर लाल दिवा पाहिजेतच, या अपेक्षेने शिंदे समर्थक आमदारांनी लॉबिंग सुरू केली आहे. शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा कोल्हापुरातील चार नेत्यांनी सर्वात आधी त्यांना पाठिंबा दिला होता. यातील एक नेता शिवसेनेचा आहे. तर बाकी नेते भाजपसोबत आहेत. त्यामुळे या चारही नेत्यांना मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. पण एका जिल्ह्यात एक मंत्रिपद द्यायचं ठरलं तर बाकी तीन नेत्यांचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. प्रकाश आबिटकर हे कोल्हापुरातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. तेही शिंदे यांच्यासोबत सुरुवातीपासूच होते. आता हे तिन्ही नेते मंत्रीपदासाठी इच्छूक आहे. आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून हे नेते लॉबिंग करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यड्रावकर आंनी तर कॅबिनेट मंत्रीपदासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आबिटकर मंत्रीपद मिळवण्यात यशस्वी ठरतात की यड्रावकर हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

हे सुद्धा वाचा

आवाडे, कोरेही इच्छूक

प्रकाश आवाडे आणि विनय कोरे या दोन मंत्र्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रत्येकवेळी हे दोन आमदार भाजपच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे आवाडे आणि कोरे यांनीही मंत्रिपद मिळावे म्हणून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन अपक्ष आमदारांना भाजप संधी देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रकांत पाटीलही नाही

कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळून कोल्हापुरात पक्ष मजबूत करण्यावर भाजप भर देईल असं सांगितलं जात होतं. मात्र, या सर्व वावड्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंद्रकांत पाटील यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नसेल असं सांगितलं जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे हे पद त्यांच्याकडेच ठेवायचं असल्याने त्यांना मंत्रिपद दिलं जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.