Maharashtra MLC Election 2021 : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात कोण ? भाजपची महत्त्वाची बैठक, महाडिक म्हणतात संधी दिल्यास ताकदीने लढू

कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोण यासाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये भाजप नेत्या शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांची नावे आघाडीवर आहेत. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखील महत्त्वाची बैठक होणरा असून याबाबत विस्तृत चर्चा केली जाईल.

Maharashtra MLC Election 2021 : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात कोण ? भाजपची महत्त्वाची बैठक, महाडिक म्हणतात संधी दिल्यास ताकदीने लढू
SATEJ PATIL AND SHAUMIKA MAHADIK AND RAHUL AWADE
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 10:16 AM

कोल्हापूर : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगूल वाजले असून सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. प्रतिस्पर्ध्यांना नमवण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोण यासाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये भाजप नेत्या शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांची नावे आघाडीवर आहेत. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखील महत्त्वाची बैठक होणार असून याबाबत विस्तृत चर्चा केली जाईल.

भाजपची महत्त्वाची बैठक, उमेदवारीवर चर्चा होणार  

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. सोलापुरात सतेज पाटील यांचं मोठं राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांचा सामना करु शकणारा एखादा तगडा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (11 नोव्हेंबर) भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. सतेज पाटील यांच्या तोडीस-तोड उमेदवार म्हणून शौमिका महाडिक किंवा राहुल आवाडे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे यांच्या नावावर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

संधी दिल्यास ताकदीने लढू

तर आज होणाऱ्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना पक्षाने आदेश दिल्यास ताकदीने निवडणूक लढवणार असं महाडिक कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय. मात्र सतेज पाटलांविरोधात शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पराभवाचा वचपा काढण्याची संधी

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात गोकूळ दूध संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महादवेराव महाडिक (Mahadevrao Mahadik) आणि आमदार पी. एन. पाटील गटाच्या तब्बल तीन दशकांच्या सत्तेला सतेज पाटील गटाने सुरुंग लावला होता. या निवडणुकीत गोकुळ दूध संघाच्या 21 पैकी 17 जागा या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळाल्या होत्या. या निवडणुकीनंतर आता कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीत सतेज पाटलांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. तर गोकूळ दूध संघ निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता महाडिक गटाला मिळणार आहे.

इतर बातम्या :

Devuthani Ekadashi 2021 | प्रबोधिनी एकादशी कधी साजरी होते, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

ST Strike | औरंगाबाद, सोलपुरातही 23 जणांचे निलंबन, ‘मागे हटणार नाही,’ एसटी कर्मचारी संपावर ठाम

Happy Birthday Mala Sinha | कधीकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करायच्या माला सिन्हा, आता मनोरंजन विश्वापासून राहतायत दूर!

(kolhapur mlc election 2021 who will fight election against satej patil shumika mahadik or rahul awad from bjp)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.