LK Advani Birthday : ‘हॅप्पी बर्थडे अडवाणीजी’, मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी (LK Advani Birthday) आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.

LK Advani Birthday : 'हॅप्पी बर्थडे अडवाणीजी', मोदी, शहा, राजनाथ, जेपी नड्डांकडून शुभेच्छांचा वर्षाव
लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी (LK Advani Birthday) आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तसंच त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल मनोकामना व्यक्त केल्या.

देश कायम अडवणींच्या ऋणात राहील- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अडवाणींन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. लोकांचे सक्षमीकरण आणि भारताचा सांस्कृतिक अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी देश त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठीही त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. देश त्यांच्या कायम ऋणात राहिल, अशा शब्दात मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या. केले आहे. “आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. त्यांची विद्वत्ता, दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता आणि मुत्सद्देगिरी सर्वांनाच मान्य आहे. भारतातील सर्वात आदरणीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो”, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केले.

प्रेरणास्त्रोताला वाढदिवसाच्या शुभेच्छा- जे पी नड्डा

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘भाजपला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. अडवाणीजी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

अमित शहांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अविरत संघर्षातून भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवून संघटनेला अखिल भारतीय रूप देण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सदैव निरोगी रहा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…”

(Lal krishna advani 94 birthday pm narendra modi Amit Shah rajnath singh JP Nadda bjp ministers greetings)

हे ही वाचा :

CRPF Jawan Firing | छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचं मन जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर

कुत्री मरते तरी दिल्लीचे नेते शोक करतात, राज्यपाल मलिक यांच्या टार्गेटवर पुन्हा मोदी सरकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.