वाढदिनीच माजी आमदाराचं निधन, काँग्रेसचे खंदे समर्थक मधुकर ठाकूर कालवश

काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग उरण (Alibag Uran constituency) मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.

वाढदिनीच माजी आमदाराचं निधन, काँग्रेसचे खंदे समर्थक मधुकर ठाकूर कालवश
Madhukar Thakur ex MLA
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 10:20 AM

रायगड : काँग्रेसचे खंदे समर्थक आणि अलिबाग उरण (Alibag Uran constituency) मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर (Madhukar Thakur) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. (Madhukar Thakur congress ex MLA of Alibag Uran constituency passed away on his birthday)

माजी आमदार मधुकर ठाकूर हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून आजारी होते. मधुकर ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला ग्राम पंचायतीपासून सुरुवात केली. अलिबागमधील तत्कालिन झिराड ग्रामपंचायती सदस्य म्हणून ते निवडून आले होते. तिथून त्यांनी जिल्हा परिषद आणि मग थेट विधानसभेपर्यंत मजल मारली.

काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता

मधुकर ठाकूर यांनी 2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. राजकीय कारकीर्दीत मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवलं. याशिवाय त्यांना प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काँग्रेसने गौरवलं.

दरम्यान, मधुकर ठाकूर यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजकीय कारकीर्द

मधुकर ठाकूर यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत मोठी मजल मारली होती

ठाकूर यांनी त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या शेकाप उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता

शेकापच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं

कारण जवळपास तीन दशकानंतर शेकापचं अलिबागमध्ये पराभव झाला होता.

संबंधित बातम्या 

“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.