मोदी हैं तो मुमकिन हैं….! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं?; महाविकास आघाडीतील नेत्यांना काय वाटतं?

अजित पवारांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला तरच या महाराष्ट्राचे हित आहे, अशा प्रतिक्रिया आता राष्ट्रवादीतून उमटत आहेत. सत्ताधारी पक्षातील काही नेतेही त्यावर बोलत आहेत.

मोदी हैं तो मुमकिन हैं....! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं?; महाविकास आघाडीतील नेत्यांना काय वाटतं?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 8:29 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. धाराशीव जिल्ह्यातील तेर ही अजित पवार यांची सासूरवाडी आहे. तेरच्या चौकाचौकात हे बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही बॅनर्स आहेत. एवढेच नव्हे तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासूरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधीवत पूजा करून साकडेही घातले आहे. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे. त्यावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एक नव्हे अनेक दावेदार : दानवे

भावी मुख्यमंत्री एक नाही अनेक असू शकतात. बॅनरबाजीला काही अर्थ नाही. घडामोडी कधीही घडू शकतात. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात अशी बॅनरबाजी करतात. आमच्यामधून गेलेल्या गद्दार आमदारांनी जर फडणवीसांना पाठिंबा दिला तर ते मुख्यमंत्री होतील, असं राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मह्टलं आहे.

हे सुद्धा वाचा

मुमकिन हैं क्या नमकिन हैं, आमचं देणं घेणं नाही: पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुमकिन हैं क्या नमकिन हैं याच्याशी आमचं देणं घेणं नाही. पुढच्या काळात यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, तेव्हाच यांच्या सत्तेचा मस्ती आटोक्यात येईल, असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली. मोदी हैं तो मुमकिन हैं….! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं !!! या प्रश्नांवरही पटोले यांनी उत्तर दिलं. आमचं याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण महाराष्ट्रात जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. शेतकरी, तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे. हे महत्वाचे प्रश्न आहे. जनतेचे प्रश्न घेवून लढायचं की खोक्यांच सरकार बनवायचं की तानाशाहांचं सरकार बनवायचं? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, असं पटोले म्हणाले.

अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत: अनिल पाटील

अजित पवारांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला तरच या महाराष्ट्राचे हित आहे. मला आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. महाविकास आघाडीने त्यासाठी परवानगी द्यावी. मविआमध्ये आमचं मत जरी विचारात घेतलं जात नसेल तरीही आमची भावना आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं मत राष्ट्रादीचे मुख्यप्रतोद अनिल पाटील यांनी व्यक्त केलं. काही का होईना जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडी प्रयत्न करणार, असंही ते म्हणाले.

म्हणजे आजच मुख्यमंत्री… : प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य केलं आहे. आमचा पक्ष वाढला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आमच्या नेत्याने (अजित पवारांनी) सूचित केले म्हणजे उद्याच त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असे नाही. पक्षाला मोठे करा, स्पर्धेत भाग घेण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. राष्ट्रवादीला बळकट करायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? : धंगेकर

माझी इच्छा मी बोलून दाखवली. सगळ्यांना वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं. तसं मलाही वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. अजित दादा खूप मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्री व्हावं अस मलाही वाटतं. अजित दादा आमचे नेते ते महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही? राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. एखाद्याला पद मिळावं असं वाटतच, असं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.