राजकीय वातावरण तापणार, मुंबईत आज जोरबैठका; मोठ्या घडामोडींची शक्यता

तिन्ही बैठका आज एकाच दिवशी होत आहेत. शिवाय या बैठका मुंबईतच होणार आहेत. त्यामुळे मुंबईचं वातावरण तापणार असल्याचं चित्र आहे.

राजकीय वातावरण तापणार, मुंबईत आज जोरबैठका; मोठ्या घडामोडींची शक्यता
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 9:54 AM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : मुंबईतील राजकीय वातावरण आज तापणार आहे. पावसाळी अधिवेशनाचं सूप परवा वाजणार आहे. त्यामुळे आज अधिवेशनात अनेक महत्त्वाची निर्णय होणार आहे म्हणून आजचं मुंबईतील राजकारण तापणार नाही. तर, आज मुंबईत तीन महत्त्वाच्या बैठकी आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकांमधून ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. चर्चगेटच्या एमसीए गरवारे लॉन्जमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत. महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

महायुतीची बैठक आज

महायुतीची बैठकही आज होणार आहे. आज सायंकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकांबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपची स्वतंत्र बैठक

दरम्यान, आज महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेतच. पण आज भाजपचीही स्वतंत्र बैठक होणार आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांचीही बैठक होणार आहे. भाजपने नुकतीच जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्या सर्वांची आज बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्षांना कामाचं स्वरुप समजावून सांगण्यात येणार आहे.

तसेच त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच या बैठकीत जिल्हाध्यक्षांना काही टार्गेट दिलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. तिन्ही बैठका आज एकाच दिवशी होत आहेत. शिवाय या बैठका मुंबईतच होणार आहेत. त्यामुळे मुंबईचं वातावरण तापणार असल्याचं चित्र आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.