2024 Election MVA Seat Allocation | महाविकास आघाडीतून तुमच्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार, वाचा यादी

maha vikas aghadi lok sabha election 2024 seats | महाविकास आघाडीचा लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चार जागांचा निर्णय चर्चेतून होणार आहे. महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपाची माहिती 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या जागावाटपात सर्वाधिक जागा ठाकरे गटासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

2024 Election MVA Seat Allocation | महाविकास आघाडीतून तुमच्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडणूक लढवणार, वाचा यादी
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 7:01 PM

दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचं जागवाटपाबाबत चर्चा सुरु आहे. याच इंडिया आघाडीतल तीन प्रमुख पक्षांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. या तीनही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केलाय. विशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा या ठाकरे गटासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागावाटपात ठाकरे गटाला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 44 मतदारसंघाच्या जागवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चार जागांवर सध्या चर्चा सुरु आहे. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या चार जागांबाबतचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं जागावाटप हे विभागानुसार जवळपास निश्चित झालंय. या संभाव्य जागावाटपाची आकडेवारी Tv9 मराठीच्या हाती लागली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा विभागानुसार जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीचं संभाव्य जागावाटप

  • शिवसेना UBT : 19 – 21
  • काँग्रेस : 13 – 15
  • NCP : 10 – 11
  • राखीव : 02

आताच्या घडीला सूरु असलेली चर्चा

  • एकूण जागा : 48
  • राखीव : 02
  • काँग्रेस : 13
  • शिवसेना UBT : 19
  • NCP : 10′
  • चर्चेतून अंतिम निर्णय : 06

विदर्भ विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

  • नागपूर : काँग्रेस
  • भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा NCP यांच्यात चर्चेतून ठरेल
  • वर्धा : काँग्रेस
  • चंद्रपूर : काँग्रेस
  • गडचिरोली : काँग्रेस
  • अमरावती : काँग्रेस आणि NCP यांच्यात चर्चेतून ठरेल
  • यवतमाळ – वाशिम : शिवसेना UBT
  • अकोला : वंचित बहुजन आघाडीसाठी (प्रकाश आंबेडकर) राखीव, ते न आल्यास काँग्रेस
  • बुलढाणा : शिवसेना UBT
  • रामेटक : शिवसेना UBT

मराठवाडा विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

  • हिंगोली : NCP आणि शिवसेना UBT यांच्यात चर्चेतून ठरेल
  • नांदेड : काँग्रेस5य
  • लातूर : काँग्रेस
  • धाराशिव : शिवसेना UBT
  • संभाजी नगर : शिवसेना UBT
  • जालना : NCP आणि शिवसेना UBT यांच्यात चर्चेतून ठरेल
  • बीड : NCP
  • परभणी : शिवसेना UBT

उत्तर महाराष्ट्र विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

धुळे : काँग्रेस

नंदुरबार : काँग्रेस

जळगाव : NCP

रावेर : NCP

दिंडोरी : NCP

नाशिक : शिवसेना UBT

शिर्डी : शिवसेना उबत

नगर : NCP

पश्चिम महाराष्ट्र विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

पुणे : काँग्रेस

बारामती : NCP

माढा : NCP

सोलापूर : काँग्रेस

कोल्हापूर : शिवसेना UBT

सातारा : NCP

सांगली : काँग्रेस आणि NCP चर्चेतून ठरेल

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी) राखीव, ते न शक्य झाल्यास NCP

मावळ : शिवसेना UBT

शिरूर : NCP

कोकण विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना UBT

रायगड : शिवसेना UBT

कल्याण : शिवसेना

भिवंडी : NCP

पालघर : शिवसेना UBT

ठाणे : शिवसेना UBT

मुंबई विभागात कोणता पक्ष कोणत्या जागेवर लढणार?

दक्षिण मुंबई : शिवसेना UBT

दक्षिण मध्य : शिवसेना UBT

ईशान्य मुंबई : शिवसेना UBT

उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस

उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना UBT

उत्तर मुंबई : काँग्रेस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.