आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही; महादेव जानकर यांनी भाजपला का सुनावले होते?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रासपची जनस्वराज्य यात्रा काल फलटणध्ये होती. यावेळी जानकर यांनी अनेक गुपितं उघडी केली.

आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही; महादेव जानकर यांनी भाजपला का सुनावले होते?
mahadev jankarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 7:47 AM

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढातून लढण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जानकर यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काल जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेचा माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण येथे समारोप झाला. यावेळी महादेव जानकर यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जानकर यांना कोणती ऑफर दिली होती? इथपासून ते मंत्रीपदाबाबतच्या अनेक नव्या गोष्टी उघड केल्या. तसेच आपलं लक्ष आता महाराष्ट्रात नसून दिल्लीकडे असल्याचंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.

माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली काल शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात येथे ही जनस्वराज्य यात्रा आली आणि तिचं रुपांतर छोटेखानी सभेत झालं. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. जन स्वराज्य यात्रेचं सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला.

हे सुद्धा वाचा

माझ्यावर दबाव टाकला

मला स्वतःच्या ताकदीवर आता दिल्लीला जायचे आहे. माझे मन मुंबईत रमत नव्हते. मला दिल्लीला जायचे होते. माझ्यावर दबाव टाकून मला राज्यात मंत्री करण्यात आले, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला.

आत्महत्या करेन

मागच्या लोकसभा निवडणुकीत काय झाले? याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.

मोदी ओबीसींच्या पाठी आहेत काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल, असा दावाही त्यांनी केला.

48 जागांवर डोळा

महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. आपला पक्ष चांगला जम धरत आहे. आपल्याला लोक स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठी फलटणमध्ये आलो आहे. तुम्ही मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.