मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपल्याच माणसांची समजूत काढण्यात अपयश, सांगलीत काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी मिटवण्याचे प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या विनंतीला दुर्लक्ष केले आहे. यामुळे जतमध्ये भाजप विरुद्ध भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपल्याच माणसांची समजूत काढण्यात अपयश, सांगलीत काय घडलं?
मंत्री चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 4:36 PM

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येत पक्षाकडून अनेक उमेदवारांची निवडणूक लढवण्याची इच्छा असते. पण पक्षाकडून ज्याला संधी देण्यात येते तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो. तर इतर इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो. महाराष्ट्रात महायुतीत मोठी बंडखोरी उफाळून आलेली बघायला मिळत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपच्या विविध स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भाजपच्या हायकमांडकडूनही महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांना बंडखोरी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील भाजप नेते बंडखोरांची मनधरणी करत आहेत. पण त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. सांगलीतील जतमध्ये आज तसाच काहीसा प्रकार बघायला मिळाला आहे. खुद्द मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत गेले असता तिथल्या बंडखोर उमेदवारांनी त्यांच्या विनंतीला मान देवून अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना आपल्याच माणसांची समजूत काढण्यात अपयश आल्याची चर्चा आता रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप समोर बंडखोरीचे आव्हान कायम राहिले आहे. भाजप बंडखोरांची समजूत घालण्यासाठी आलेल्या भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. जतमधील भूमिपुत्र आणि नाराज भाजप नेते आणि बंडखोर उमेदवारांनी चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव धुडकावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पक्षासोबत राहण्याबाबत केलेली विनंती भाजप बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांच्यासहित माजी आमदार विलासराव जगताप यांनी नाकारली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध

याचबरोबर भाजपाच्या सर्व नाराजांनी आम्ही माघार घेणार नाही, लढणार असल्याचे स्पष्टपणे चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे. त्यामुळे जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या उमेदवारीनंतर उफाळलेला वाद हा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे दिसत आहे. जतच्या भाजप नाराजांनी आणि बंडखोर उमेदवारांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेला निरोप पाहता जतमध्ये भाजपा समोरील बंडखोरी ही अटळ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जतमध्ये भाजप विरुद्ध भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. तर भाजपचे तिसरे नाराज नेते प्रकाश जमदाडे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.