मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, त्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया! काय म्हणाले सुभाष देसाई?
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीही तिखट उत्तर दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं, त्याची प्रत नुकतीच माध्यमांसमोर आली. तुमच्या धमकीवजा पत्रामुळे मी निराश झालोय, तसेच परवानगी देण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी पाठवले. […]
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीही तिखट उत्तर दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं, त्याची प्रत नुकतीच माध्यमांसमोर आली. तुमच्या धमकीवजा पत्रामुळे मी निराश झालोय, तसेच परवानगी देण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी पाठवले. यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेते सुभाष देसाई (Shubhash Desai) यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेनं स्पष्टपणे नमूद केलं आहे की सरकार सल्ला देईल त्याप्रमाणं राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे.
‘विधीमंडळ स्वतंत्र, सर्वोच्च न्यायालयही हस्तक्षेप करत नाही’
राज्यपालांच्या पत्राला प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई म्हणाले, भारतीय राज्य घटनेनं स्पष्टपणे नमूद केलं आहे की, सरकार सल्ला देतं त्याप्रमाणं राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे. विधिमंडळ सर्वोच्च आहे. यात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे राज्यपाल जेव्हा या प्रक्रियेला राजी होतील, तेव्हा अध्यक्षपदाबाबतच्या निवडणुकीची प्रक्रिया होईल. सुभाष देसाई म्हणाले, ‘ राज्यपाल राजी होतील, अनुमती देतील तेव्हा निवडणूक होईल. आम्हाला, सरकारला असं अपेक्षित आहे की, राज्यापालांनी राज्य घटनेप्रमाणं निर्णय घेतले पाहिजेत. विधानपरिषदेच्या 12 जागांच्या बाबत राज्यपालांना भेटलो, पत्र दिली गेली, स्मरणपत्र दिली. भेटून आवाहन केलं. आता त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, अशी आशा करतो.
‘विरोधी पक्षाच्या मागणीनुसार राज्यपालांची पावलं’
भाजप महाविकास आघाडीविरोधात याप्रकरणी राजकारण करतंय का, या प्रश्नाला उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अशी शंका व्यक्त केली आहे. भाजपचं जे धोरण आहे. मागण्या आहेत, त्यांचा पाठपुरावा राजभवनमधून होतोय का? भाजप विरोधी पक्ष म्हणून मागणी करतोय, तशीच पावलं राज्यपालांकडून पडत असतील तर यावर निश्चितच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, असेही सुभाष देसाई म्हणाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या नाराजीवर बाळासाहेब थोरतांनीही उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ राज्यपालांना कोणते शब्द आवडले नाहीआवडले मला माहित नाही. या प्रक्रियेत मतभेद आहेत हे विचाराचे मतभेद आहेत. आम्ही जो नियमांमध्ये बदल केलाय तो योग्य केलाय. ज्या पद्धतीने लोकसभेत अध्यक्षाची निवड होते त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेत केली आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करतात तशीच शिफारस मुख्यमंत्री राज्यपालांकडे करतात. घटनात्मक चूक आम्ही केली नाही. राज्यपाल म्हणतात, मला घटनात्मक चूक वाटते. मात्र आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहोत, राज्यपालांचा मान राखण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. ‘
इतर बातम्या-