‘आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष’

'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय.

'आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष'
लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांचं 72 तास अन्नत्याग आंदोलन
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 5:23 PM

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. मात्र, हा बंद म्हणजे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केलीय. ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का? असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय. (Farmers’ hunger strike in Latur, Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi)

अतिवृष्टी आणि महापुरासोबतच मानवनिर्मित संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी आज अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. लातूर येथे मांजरा धरणाचे पाणी चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यातून सोयाबीन सारखी पिके उद्ध्वस्त झाली. या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 72 शेतकरी 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. तसंच पंचक्रोशीतील गावांनी चूल बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला हजारो गावकरी पाठिंबा देण्यासाठी जमत आहेत. भाजपचे आमदार संभाजी पाटील तसेच रमेश कराड हे देखील उपस्थित आहेत.

‘लातूरला मिळालेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी’

एकिकडे शेतकऱ्यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे दाखवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एकाही नेत्याने या गावकऱ्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तसेच लातूरला अतिवृष्टीला मिळालेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

‘जनतेत दहशत माजवण्याचा प्रयत्न’

लातूरसारखाच महाराष्ट्रातला शेतकरी हलाखीने त्रस्त असताना, हाताची घडी घालून व सर्वसामान्य जनतेस वेठीस धरून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यास पाठिंबा देणाऱ्या सरकारने लखीमपूर दुर्घटनेचेही राजकारण सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला. बळाचा, सरकारी यंत्रणेचा आणि सरकारच्या आशीर्वादाने गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेत दहशत माजवू पाहत आहेत. या बंदला जनतेचा तीव्र विरोध असल्याचे सकाळपासूनच्या अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे, असंही उपाध्ये म्हणाले.

‘ढोंगी सरकारचं राजकारण उघड’

लातूरमध्ये 72 शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि शेकडो घरांमध्ये चूल बंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवून उत्तर प्रदेशातील घटनेवर बेगडी सहानुभूती दाखविणाऱ्या ढोंगी सरकारचे राजकारण उघडे पडले आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केलीय.

लातूरमध्ये भाजपचे 72 तास अन्नत्याग आंदोलन

मागील काही दिवसांपूर्वी नाशिक, उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली. नदी, नाले तसेच ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण खरीप हंगाम गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी भाजप म्हणजेच विरोधी पक्षाकडून केली जात आहे. लातूरमध्ये भाजप नेते संभाजी पटील निलंगेकर याच मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. त्यांनी 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात खुद्द संभाजी पाटील निलंगेकर तसेच आमदार रमेश कराड सहभागी झाले आहेत. तसेच या नेत्यांसोबत शेतकरी देखील उपस्थित आहेत.

इतर बातम्या :

महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा नाना पटोलेंचा दावा, भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा

आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

Farmers’ hunger strike in Latur, Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.