Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडून चार आमदारांना फोन, पुन्हा दिग्गजांनाच संधी; गृहमंत्रीपदही भाजपकडेच राहणार
भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विखे पाटलांच्या नावांची चर्चा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद राहणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), विखे पाटील यांना फोन गेल्याची माहिती मिळते. भाजपकडून तीन तर शिंदे गटाकडून चार नेत्यांना फोन गेले. मुनगंटीवार, महाराज आणि विखे पाटील (Vikhe Patil) हे तिन्ही नेते दिग्गज आहेत. त्यामुळं गृहमंत्रीपद भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे आणि संजय सिरसाट यांना फोन गेल्याची माहिती आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. तत्पूर्वी 9 वाजता शिंदे गटाची सह्याद्रीवर बैठक होणार आहे. 20 ते 25 मंत्र्यांचा उद्या शपथविधी निश्चित आहे. यामध्ये शिंदे आणि भाजपतील काही आमदारांचा समावेश आहे. दोन टप्प्यामध्ये हा विस्तार होणार आहे. हा पहिला टप्पा मानला जात आहे.
शेलार, दरेकर यांच्याही नावाची चर्चा
60 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. 40 टक्के अनुभवी आमदार राहू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या बाबतीत ही शक्यता आहे. सगळ्यांना खूश करणं शक्य नाही. विधानभवनातील सेंट्रल हॉल किंवा राजभवन यापैकी एका ठिकाणी हा शपथविधी सोहळा पार पडू शकतो. भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विखे पाटलांच्या नावांची चर्चा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
विखे पाटील म्हणतात, साईबाबा देतील ती जबाबदारी पार पाडू
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे-फडणवीसांमध्ये दोन तास खलबत झाली. मुंबईतून एक ते दोन आमदारांनी मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून नऊ ते दहा मंत्री शपथ घेतील. सत्तारांचा पत्ता पहिल्या टप्प्यात कट होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांचं नाव निश्चित आहे. राधाकृष्ण विखे पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांनाही मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे. साईबाबा जी जबाबदारी देतील ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली.