अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश; विस्तार आजच?

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आज किंवा उद्या या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजप नेते अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश; विस्तार आजच?
amit shahImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 7:19 AM

मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी हा तिढा सोडवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सलग तीन दिवस तीन रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाती वाटपाची चर्चा सुरू होती. पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. एक तर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता. तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही माथापच्ची सुरू होती. हा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल संध्याकाळी दिल्ली गाठली.

हे सुद्धा वाचा

अन् फॉर्म्युला ठरला

दिल्लीत आल्यावर अजित पवार आणि पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सर्व खात्यांवर चर्चा झाली. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. यावेळी नव्या विस्तारासाठी 4-4-2 हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभांबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. तसेच येणारा काळ युतीसाठी किती अनुकूल असेल याची माहितीही शाह यांनी या दोन्ही नेत्यांकडून घेतल्याचं सांगितलं जातं.

काय आहे 4-4-2 फॉर्म्युला?

4-4-2 फार्म्युल्यानुसार भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रिपद मिळणार असून राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.

आजच शपथविधी

दरम्यान, दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. काही आमदार गावाला आहेत. ते जर संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊ शकले तर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

खाते वाटपही आज किंवा उद्या

राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांना आधीच मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. पण त्यांना खाती देण्यात आलेली नाही. या खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यांना आजच खाती दिली जाण्याची शक्यता आहे. किंवा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर नव्या मंत्र्यांसह सर्वांची खाते वाटप केले जाऊ शकते, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.