Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटपही जाहीर, कुणाला कोणतं खातं? वाचा सविस्तर

मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. खातेवाटपात नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आली आहेत.

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटपही जाहीर, कुणाला कोणतं खातं? वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे, भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:34 PM

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वामधील सरकार स्थापन होऊन महिना लोटला. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अखेर आज गंगेत न्हालं. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) आज पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. खातेवाटपात नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

  1. एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
  2. देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
  3. राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
  4. चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
  5. सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
  6. मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
  7. रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
  8. उदय सामंत – उद्योग
  9. दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
  10. सुरेश खाडे – सामाजिक न्याय
  11. दादा भुसे – कृषी
  12. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  13. गिरीश महाजन – जलसंपदा
  14. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  15. अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
  16. अतुल सावे – आरोग्य
  17. तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
  18. संजय राठोड – ग्रामविकास
  19. शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
  20. संदीपान भुमरे – रोजगार हमी

मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे, पण महत्वाची खाती भाजपकडे

भाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत. तर महसूल खातं भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबजदारी सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय.

17 ऑगस्टपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन

मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता 17 ऑगस्ट पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. शिंदे सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अशावेळी राज्यातील अतिवृष्टी, पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा अनेक मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकार स्थापन झालं तरी महिनाभर विस्तार रेंगाळला. त्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पावसाळी अधिवेशनात अजित पवार अधिक आक्रमकपणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.