Eknath Shinde : भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केले तर मुंबई हातची जाईल; शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

Eknath Shinde : शिवसेना हा एकमेव 'महाराष्ट्रीय' बाण्याचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे तो जगभर प्रतिनिधित्व करतो, त्यासाठी प्राणांची बाजी लावतो याची पोटदुखी ज्यांना होती त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली.

Eknath Shinde : भाजपच्या 'हो'ला 'हो' केले तर मुंबई हातची जाईल; शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
भाजपच्या 'हो'ला 'हो' केले तर मुंबई हातची जाईल; शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 7:05 AM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. शिंदे यांच्या या दिल्लीवारीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटास मंत्रीपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल. तेव्हा शिंदे गट काय करणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मुंबईतील अनेक केंद्र सरकारी कार्यालये इतर राज्यांत हलवली. एअर इंडियाचे मुख्यालयही नेले, असे बरेच काही पडद्यामागे घडते आहे. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल, असंही शिवसेनेने म्हटलं आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून हा सवाल करण्यात आला आहे.

शिवसेना हा एकमेव ‘महाराष्ट्रीय’ बाण्याचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे तो जगभर प्रतिनिधित्व करतो, त्यासाठी प्राणांची बाजी लावतो याची पोटदुखी ज्यांना होती त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली. शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे असे छगन भुजबळ म्हणाले. प्रादेशिक अस्मितेस कायमचे खतम करण्याचे डावपेच देशभरात सुरू आहेत. राजकारणात, राज्यात व देशात फक्त आम्हीच राहू, आम्ही सांगू तेच हिंदुत्व, तोच राष्ट्रीय बाणा याच वातावरणाचे हेलकावे सर्वत्र बसत आहेत. राष्ट्राचे अस्तित्वच यामुळे धोक्यात येईल. मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी सध्या दिल्लीकर सोडत नाहीत. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून गुजरातला नेले व त्याचे समर्थन फडणवीस करतात. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःस शिवसैनिक समजतात. फडणवीसांच्या भूमिकेस त्यांचा पाठिंबा आहे काय?, असा सवाल शिवसेनेने अग्रलेखातून केला आहे.

हे सुद्धा वाचा

अग्रलेखात आणखी काय?

  1. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटास मंत्रीपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही.
  2. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान कार्यालयात व दिल्लीतील भाजप वर्तुळात विशेष स्वागत होऊ शकते. शिवसेनेत फूट पाडून व मराठी माणसांची ऐक्याची वज्रमूठ फोडून शिंदे हे दिल्लीस जात आहेत. शिंदे व त्यांच्या लोकांनी जे केले, त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल व दिल्लीला नेमके तेच हवे आहे.
  3. जाताना त्यांनी महाराष्ट्रहिताचा कोणता कार्यक्रम पंतप्रधानांच्या समोर ठेवण्यासाठी नेला ते स्पष्ट केले पाहिजे. इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाला. कारण कर्नाटकच्या सरकारने सीमा भागात मराठी बांधवांवर नव्याने दमनचक्र सुरू केल्याचे वृत्त आले आहे.
  4. आधीच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती. शिंदे यांनी बेळगाव व सीमा भागात जाऊन तेथील मराठी बांधवांवरील अन्यायाचे परिमार्जन करावे अशी अपेक्षा होती. आता ते मुख्यमंत्री झाले व तेही भाजपच्या पाठिंब्याने. त्यामुळे कर्नाटकातील भाजप सरकार शिंदे यांचा शब्द खाली पडू देणार नाही याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही.
  5. शिंदे हे दिल्लीत शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. तसे वचन पहिल्याच दिवशी आपले पंतप्रधान मोदी यांनी दिलेच आहे. आरेचे जंगल तोडता येणार नाही, ते जंगल म्हणजे मुंबईचे फुप्फुस आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली तर मुंबईचे लोक व जगभरातील पर्यावरणवादी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच करतील.
  6. महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका! महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.