Maharashtra Corona Update : आता बाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन
बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलीय.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढत आहे. अशावेळी नेतेमंडळींच्या मुलांचे विवाह सोहळे मात्र मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहेत. मात्र, त्याचा फटका आता दिसून येत आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) आणि निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेला एक एक नेता आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असं आवाहन थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलंय.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
हर्षवर्धन पाटीलही कोरोना पॉझिटिव्ह
हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा 28 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. आता हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागणी झाल्यानं आता या विवाहसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती.
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) December 30, 2021
सुप्रिया सुळे, सदानंद सुळेंनाही कोरोनाची लागण
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 29 डिसेंबर रोजी त्यांच्या टि्वटर हँडलवरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना
काल दिनांक 28 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांनीदेखील ट्विट करून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे इतर मंत्र्यांनाही बाधा होते की काय ही चिंता वाढली आहे.
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I’m fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
इतर बातम्या :