डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? असे प्रश्नही शेलार यांनी विचारले आहेत.

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
आशिष शेलार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 10:04 PM

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेट अॅन्ड वॉचचीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि मनसेनं सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. ‘काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारलाय. (Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray over decision to close temples)

डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का, याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? असे प्रश्नही शेलार यांनी विचारले आहेत.

‘हे तर शिवसेनेचं देऊळबंदीचं अभियान’

‘पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत, मॉल मधल्या कामगारांचं कारण सांगून मॉल उघडे केलेत. मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ, अगरबत्ती, फुलं विकणाऱ्यांचं पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होउ शकत नाही. कारण, आमचा तो गरीब माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी, त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बारवाले वाटाघाटी करतील. आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भुमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको ही आमची भुमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भुमिका नाही. भक्तांची देवापासून ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून हा कोरोना बंदीचा कार्यक्रम नाही, तर हे देऊळ बंदीचं शिवसेनेचं अभियान आहे, अशी टीका शेलारांनी केलीय.

‘देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय उघडली’

ज्या पद्धतीने हे प्रकार चालू आहेत, त्यावर मुख्यमंत्री कधी बोलतील का हा प्रश्न आहे. आरोग्य केंद्राचं बोलतात तर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इथून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील 741 बालकांचा 6 महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आऱोग्य केंद्र? कुठे आहेत पायाभुत सुविधा? देवालय नको ही तुमची भुमिका असेल पण देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय तुम्ही उघडली आहेत. महानगरपालिकेच्या इस्पितळात डोळा कुरतडून खाल्ला म्हणून मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजुला जिवंत माणसांवर ट्रिटमेंट, कोविड सेंटर मधे टाॉयलेटमध्ये मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू. थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवा. कोरोना बंदीच्या नावावर देउळ बंदी करु नका, असं आवाहनही शेलार यांनी यावेळी केलंय.

इतर बातम्या :

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी! मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास देसाईंचा विरोध?

भाजप खासदार सुभाष भामरेंना चिकनगुनियाची लागण, उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray over decision to close temples

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.