महापुरानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचं मोठं नुकसान, नितीन गडकरींकडून 100 कोटीचा निधी मंजूर
मुंबई-गोवा हायवेच्या दुरुस्तीचं काम तातडीनं करण्याची मागणी तटकरे यांनी केली होती. गडकरी यांनीही राज्यातील खासदारांच्या मागणीला प्रतिसाद देत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.
मुंबई : मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली होती. गणेशोत्सव काळात मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील गावी जात असतात. त्यामुळे मुंबई-गोवा हायवेच्या दुरुस्तीचं काम तातडीनं करण्याची मागणी तटकरे यांनी केली होती. गडकरी यांनीही राज्यातील खासदारांच्या मागणीला प्रतिसाद देत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. ( Nitin Gadkari provides Rs 100 crore for repair of Konkan and Western Maharashtra roads)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 52 कोटी रुपये हे तात्तपुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी तर 48 कोटी रुपये हे कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी दिल्याची माहिती गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिलीय. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्टी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता. त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहितीही गडकरी यांनी दिलीय.
Immediate steps have been taken up to restore the roads affected by unprecedented rains in Konkan and Western Maharashtra. 100 Cr has been sanctioned in this regard. This includes 52 Cr for temporary restoration and 48 Cr for permanent restoration.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
इतकंच नाही तर परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळेही दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असं आश्वासनही गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.
Interruptions at Parshuram Ghat, Karul Ghat, Amba Ghat have also been cleared. Temporary restoration work are already initiated and permanent restoration works will also be taken on priority.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2021
संजय काका पाटलांकडून हरदीपसिंग पुरी यांची भेट
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सची टीम सर्वेक्षण करणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महापुरामुळं मोठं नुकसान झालं आहे. वस्त्यांमध्ये काय उपाययोजना कराव्यात याची चर्चा पाटील यांनी केली. मतदारसंघातील लोकांचं मत घेऊन पर्याय सुचवायचे आहेत. पूरग्रस्त भागात कायमस्वरुपी उपाय केला जाईल. स्मार्ट सिटी अंतर्ग काम केलं जाणार असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली आहे.
VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 5 August 2021https://t.co/64V3ctc7Gz | #50SuperFastNews | #Mumbai | #Mumbailocaltrain | #Uddhavthackeray | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पहिल्यांदाच दिलासादायक विधान
Nitin Gadkari provides Rs 100 crore for repair of Konkan and Western Maharashtra roads