अखेर अजित पवार यांना मंत्रालयात दालन मिळालं, मंत्रालयात आले, पण कोणत्या खात्याचं काम पाहणार?

नव्या मंत्र्यांना आजच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला अर्थ, सहकार, कृषी, महिला आणि बालकल्याण, सामाजिक न्याय, ग्रामविकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अखेर अजित पवार यांना मंत्रालयात दालन मिळालं, मंत्रालयात आले, पण कोणत्या खात्याचं काम पाहणार?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:56 AM

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचं खात वाटप झालेलं नाही. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व नऊ मंत्री बिना खात्याचेच आहेत. खाती मिळाली नसली तरी मंत्र्यांनी मंत्रालयात कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार यांना अद्याप दालन देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी मंत्रालयातून काम सुरू केले नव्हते. मात्र आज सकाळीच अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यांना केबिनही देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दालन असलेल्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांना दालन देण्यात आलेलं नाही.

अजित पवार यांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर दालन देण्यात येणार आहे. 602 क्रमांकाची केबिन रिक्त आहे. पण ही केबिन शापित असल्याने कोणीच ही केबिन घेत नाही. अजित पवार यांनीही ही केबिन घेतली नाही. त्यामुळे बाजूच्या दोन केबिन एकत्रित करण्याचं काम सुरू असून ही नवी केबिन अजित पवार यांना देण्यात येणार आहे. त्या केबिनचं कामही सुरू आहे. मात्र, त्यात वेळ जाणार असल्याने अजित पवार यांच्यासाठी पाचव्या मजल्यावर 502 क्रमांकाची केबिन देण्यात आली आहे. अजितदादांना 502 क्रमांकाच्या केबिनमध्ये तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केबिनच्या बाहेर अजितदादा यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. आज सकाळीच अजितदादांनी या केबिनमध्ये येऊन आपल्या कारभाराला सुरुवातही केली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या खात्याचं काम पाहणार?

अजितदादा सकाळीच देवगिरी या आपल्या निवासस्थानावरून निघाले आणि त्यांनी तडक मंत्रालयात येऊन कारभार स्वीकारला. थोड्यावेळाने ते विधानभवनातही जाणार आहेत. मात्र, खाते वाटपच झालेलं नाही. त्यामुळे अजितदादा कोणत्या खात्याची कामे पाहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजितदादा नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच कार्यालयात आल्याने अधिकाऱ्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या आहेत. अजितदादा हे सकाळी लवकर काम सुरू करतात. उशिरापर्यंत त्यांचं काम सुरू असतं. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनाही लवकरच मंत्रालयात पोहोचावे लागणार आहे.

राष्ट्रवादीला भाजपची खाती

दरम्यान, नव्या मंत्र्यांना आजच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला अर्थ, सहकार, कृषी, महिला आणि बालकल्याण, सामाजिक न्याय, ग्रामविकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही सर्व खाती भाजपकडची आहे. भाजपच्या कोट्यातील खाती राष्ट्रवादीला दिली जात आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातील खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार नाही.

नव्या मंत्र्यांची दालने

छनग भुजबळ – 2 रा मजला, दालन क्रमांक 201 (मंत्रालय मुख्य इमारत)

हसन मुश्रीफ – 4 था मजला, दालन क्र. 407 (मंत्रालय विस्तार इमारत)

दिलीप वळसे पाटील – 3 रा मजला, दालन क्र 303 (मंत्रालय मुख्य इमारत)

धनंजय मुंडे – 2 रा मजला, दालन क्रमांक 201 ते 204, 212 (मंत्रालय विस्तार इमारत)

धर्मरावबाबा आत्राम – 6वा मजला, दालन क्र. 601, 602, 604 (मंत्रालय विस्तार इमारत)

अदिती तटकरे – 1 ला मजला, दालन क्र. 103 (मंत्रालय मुख्य इमारत)

अनिल पाटील – 4 था मजला, दालन क्र 401 (मंत्रालय मुख्य इमारत)

संजय बनसोडे – 3 रा मजला, दालन क्र 301 (मंत्रालय मुख्य इमारत)

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.