पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीस, दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; भाई जगताप यांची मागणी

मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. (maharashtra government should lodge fir against devendra fadnavis: bhai jagtap)

पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीस, दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; भाई जगताप यांची मागणी
भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 5:31 PM

मुंबई: मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून ही मागणी केल्याचंही भाई जगताप यांनी सांगितलं. (maharashtra government should lodge fir against devendra fadnavis: bhai jagtap)

भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वत: जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना ही मागणी केली होती. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे, असं ते म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासाठी मी सरकारला पत्रं दिलं आहे. त्याला आठ दिवस उलटले तरी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली.

भाई जगतापांचा सवाल

सचिन वाझेंच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मी बीकेसी प्रकरणी मी स्वतः जाऊन पत्र दिलं आहे, मग राज्य सरकार गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल त्यांनी केला. बीकेसी पोलीस ठाण्यात रात्रीच्यावेळी एका व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोहचले होते. याप्रकरणी ते त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती. परंतु अद्याप काहीच झालं नाही. सचिन वाझे या गुन्हेगारांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो मग मी पत्र देऊन देखील देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि उपस्थित आमदारांवर गुन्हा दाखल का होत नाही. असा सवालही त्यांनी केला.

सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होणार होता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होणार होता. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्यातील एका तक्रारीमुळे अकोल्यात त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.

लॉकडाऊनबाबत सरकारसोबत

आज राज्याने दीड कोटी नागरिकांचं लसीकरण केलं आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. मुंबईत 138 लसीकरण केंद्र आहेत. तसेच मुंबईत 227 वॉर्ड आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात किमान 2 सेंटर तयार करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील कोरोना कंट्रोल करण्यासाठी कोर्टाने कडक लॉकडाऊन करावं असं म्हंटल आहे. आम्ही याबाबत राज्य सरकार यांच्यासोबत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (maharashtra government should lodge fir against devendra fadnavis: bhai jagtap)

संबंधित बातम्या:

सुनील माने आणि शिवसेना कनेक्शनची चौकशी करा; भाजपचं एनआयएला पत्रं

Rajeev Satav | काँग्रेस खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, पुण्यातील रुग्णालयात ICU मध्ये उपचार

सरकारने चौकश्या लावल्या, परमबीर सिंग यांची कोर्टात धाव; पुन्हा केला गंभीर आरोप

(maharashtra government should lodge fir against devendra fadnavis: bhai jagtap)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.