तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा

राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 6:40 PM

मुंबई: राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी हा दावा केला. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. त्यामुळे राज्यावर राजकीय संकट येणार नाही. राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

तीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. महाराष्ट्र कधीही कुणाला घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. माझं एक एक पाऊल मी दमदारपणे टाकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आमचं सरकार आल्यानंतर राज्यात संकटाची मालिका सुरू झाली. नैसर्गिक संकटातही काही लोकांनी राजकारण केलं. हे दुर्देवी आहे, अशी भाजपवर टीका करतानाच कोरोनाच्या काळात आम्ही कधी कोरोनाच्या आकड्यांची लपवाछपवी केली नाही. या संकटावरही आपण लवकरच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अजितदादांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

या दोघांनी कोरोनाची औषधे, इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास दोन्ही नेत्यांकडून सुरु होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, असंही ते म्हणाले. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही: अजित पवार

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

‘BHR घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग; पैसे खाताना कचराही सोडला नाही’ : अनिल गोटे

(Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.