Maharashtra Politics : ठाकरे सरकारची विधान परिषद सदस्यांची यादी बाद होणार; शिंदे-फडणवीस सरकार नवी यादी राज्यपालांना पाठवणार

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारकडून विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून एक यादी दिली जाणार आहे. जुनी यादी परत मागवून नवी यादी पाठवली जाणार आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

Maharashtra Politics : ठाकरे सरकारची विधान परिषद सदस्यांची यादी बाद होणार; शिंदे-फडणवीस सरकार नवी यादी राज्यपालांना पाठवणार
ठाकरे सरकारची विधान परिषद सदस्यांची यादी बाद होणार; शिंदे-फडणवीस सरकार नवी यादी राज्यपालांना पाठवणार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 12:44 PM

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) दोन वर्षापूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याकडे विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची यादी पाठवली होती. पण राज्यात सत्तांतर झालं तरी राज्यपालांनी या सदस्यांच्या यादीला मंजुरी दिली नव्हती. ही यादी मंजूर का केली जात नाही याबाबतही भाष्य केलं नव्हतं. या प्रकरणी कोर्टात (court) याचिका सादर करण्यात आली होती. त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय घेतला नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राज्यपालांच्या अनेकदा भेटी घेतल्या. तरीही ही यादी मंजूर झाली नाही. आता मात्र, राज्यात आलेल्या नव्या सरकारने ही यादी परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांना नवी यादी पाठवणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची जुनी यादी बाद होणार असल्याचं सांगितलं जात असून नव्या यादीत आपलं नाव यावं म्हणून इच्छुकांनी सेटिंग सुरू केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून एक यादी दिली जाणार आहे. जुनी यादी परत मागवून नवी यादी पाठवली जाणार आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे. जुनी यादी परत मागवण्यासाठी प्रस्ताव करावा लागतो. तो कॅबिनेटच्या बैठकीत करण्यात आला आहे. तो प्रक्रियेचा भाग आहे. राज्यपाल कधी यादी देईल आणि परत राज्यपालांना कधी नवी दिली जाईल हे माहीत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे ठाकरे सरकारची यादी बाद होणार असल्याचं स्पष्ट झालं असून त्यामुळे आमदार होऊ पाहणाऱ्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

इच्छुकांची सेटिंग

शिंदे-फडणवीस सरकारकडून विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपालांकडून जुनी यादी मागवून नवी यादी राज्यपालांना पाठवली जाणार आहे. त्यामुळे विधान परिषदेवर आपली वर्णी लागावी म्हणून इच्छुकांनी सेटिंग सुरू केली आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस विधान परिषदेवर कुणाला पाठवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिली यादी कधी पाठवली?

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 6 नोव्हेंबर 2020मध्ये ठाकरे सरकारने राज्यपालांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठीच्या 12 सदस्यांची यादी पाठवली होती. ही यादी दोन वर्ष झाली तरी राज्यपालांनी मंजूर केली नव्हती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्र्यांनी राज्यपालांची अनेकदा भेट घेऊनही राज्यपालांनी ही नियुक्ती केली नव्हती. आता ही यादीच बदलण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे आमदार बनण्याचं या बाराही सदस्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.