AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानेच होणार, नियम समितीच्या बैठकीत निर्णय

आता विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानानेच होणार आहे. नियम समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात ाला आहे. 22 डिसेंबरला विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानेच होणार, नियम समितीच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्र विधानसभा
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 7:13 PM
Share

मुंबई : नाना पटोले (Nana Patole) हे विधानसभा अध्यक्षपदावरुन (Legislative Assembly Speaker) पायउतार झाल्यानंतर अद्याप विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. त्यावरुन भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहेत. अशावेळी आता विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानानेच होणार आहे. नियम समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात ाला आहे. 22 डिसेंबरला विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्य डॉ. संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अध्यक्ष आणि सभापती निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जात आहे? असा सवाल भाजप सदस्यांनी उपस्थित केला.

नियम बदलण्यामागे नेमके कारण काय? भाजपचा सवाल

महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचं काम करतो. विधानसभेच्या अमृत महोत्सवी वर्षात हा नियम बदलण्यामागे नेमके कारण काय? असा सवालही भाजपने उपस्थित केलाय. तसंच भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या दिवशी म्हणजे 6 जुलैला झालेल्या नियम समितीच्या बैठकाला भाजप सदस्यांना हेतुपुरस्सर बोलावण्यात आलं नाही, असा आरोपही भाजप सदस्यांनी केला आहे. या बैठकीत नियम बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. नियम समितीच्या बैठकीत नियमबाह्य कृती केल्याचा भाजप सदस्यांचा आरोप आहे. त्यावर 22 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत चूक मान्य करताना ती अनावधानाने झाल्याचं उपाध्यक्षांनी मान्य केलं आहे.

हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिलं होतं.

इतर बातम्या :

Breaking : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यावरच निवडणूक घ्याव्यात, राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव, पुढे काय होणार?

Video : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पत्रकारांना शिविगाळ! लखीमपूर हिंसा प्रकरणात प्रश्न विचारल्यानं मंत्रिमहोदय खवळले

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.