AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांनी डिवचले

भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे, असं जयंत पाटील म्हणाले (Jayant Patil slams Devendra Fadnavis in Pandarpur election rally).

फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांनी डिवचले
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
| Updated on: Apr 14, 2021 | 11:44 PM
Share

पंढरपूर : भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात केला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला (Jayant Patil slams Devendra Fadnavis in Pandarpur election rally).

‘भारत नानांबद्दल आदर, मग निवडणूक का?’

भाजप प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे? असा सवाल करतानाच मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

‘भाजपने 24 गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं’

“भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पाच वर्षे पक्षीय राजकारण केले. भारतनाना भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या 24 गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आणि आज फडणवीस इथे येऊन भाजपला मत द्या सांगत आहेत. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो. अहो मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील?”, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

पंढरपूर-मंगळवेढाकरांना मतदान करण्याचं आवाहन

“विठ्ठल – रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न, कारखान्यांचे प्रश्न, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या”, असे आवाहनही जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढाकरांना केले आहे (Jayant Patil slams Devendra Fadnavis in Pandarpur election rally).

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.