देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा आहेत. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज भाजपचे विरोधाीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात वादंग उठण्याची शक्यता आहे.
काय आहेत आरोप?
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर टीका केली, तर त्यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु
समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.
ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे. निरज गुंडे त्यांच्यामध्ये जाऊन कसा बसतो, का भाजपचे लोक सुटतात. आता ते हेच बोलतील की आम्हाला माहित नव्हतं. पण, त्यांना माहित होतं.
मिसेस फडणवीसांच्या फोटोसह मलिक यांचा आरोप
याआधी, नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला होता. या फोटोत मिसेस फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. ‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय?’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांच्या ट्वीटचा हवाला देत नवाब मलिक यांनी विचारला होता. निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अमृता फडणवीस यांचा एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्ज नेक्सस असा उल्लेख केला आहे. याच फोटोचा आधार घेत मलिक यांनी ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असं ट्वीट केलं होतं
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
संबंधित बातम्या :
‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? अमृता फडणवीसांचा फोटो, नवाब मलिकांचा सवाल
नवाब मलिकांचे सर्व आरोप खोटे, क्रांती रेडकर यांचा पुन्हा एकदा दावा
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम