अख्खं घरच पॉझिटिव्ह होतंय, त्यामुळे घरातही मास्क घाला, तज्ज्ञांचं ऐका; उदय सामंत यांचं आवाहन

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये अख्खं घरच पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे घरात मास्क घालण्याचं आवाहन तज्ज्ञ करत आहेत. (maharashtra minister uday samant on mask wearing at home)

अख्खं घरच पॉझिटिव्ह होतंय, त्यामुळे घरातही मास्क घाला, तज्ज्ञांचं ऐका; उदय सामंत यांचं आवाहन
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:43 PM

मुंबई: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये अख्खं घरच पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे घरात मास्क घालण्याचं आवाहन तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचं ऐका. घरातही मास्क घाला, असं आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. (maharashtra minister uday samant on mask wearing at home)

टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना उदय सामंत यांनी हे आवाहन केलं आहे. मान्यवर जे सांगत आहेत. ते ऐका. डबल मास्क वापरून आणि घरातही मास्क लावून धोका कमी होत असेल तर मास्क वापरलं पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. एखादा रुग्ण घरात क्वॉरंटाईन असेल तर त्याच्यापासून विषाणू पसरू शकतो. त्यामुळे घरात मास्क घालायला हरकत नाही. घरच पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांचं ऐका, असं सामंत म्हणाले.

जनतेच्या मनातील निर्णय होईल

राज्यात 1 तारखेपासून लसीकरण होणार होत आहे. आपल्याकडे अजून तीन-चार दिवस आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विचारात घेऊन मोफत लसीकरणावर निर्णय घेतील. जनतेच्या मनातील निर्णय घेतला जाईल. तो त्यांचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले. ऑक्सिजन आम्हीच आणला. रेमडेसिवीर आम्ही आणला. 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णयही केंद्राने आमच्यामुळेच घेतला. याला श्रेयवाद म्हणातत, असं सांगतानाच पंतप्रधानांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले. तेव्हा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारच मानले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

बीडचा प्रकार चुकीचाच

बीडमध्ये रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबून स्मशानभूमीत नेल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रुग्णालयाची चूक झाली आहे. या चुकीला माफी नाही. परंतु, कोरोना रुग्ण वाढत असल्याने ही चूक झाली आहे. जिल्हाधिकाऱ्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून खरं काय ते निष्पन्न होईल, असं त्यांनी सांगितलं. ही घटना धडा घेण्यासारखी आहे. कोरोना प्रचंड प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे या घटनेला मी दोन बाजूने पाहतो. एक म्हणजे ही घटनाच चुकीची आहे. परंतु, दुसरी बाजू अशी की लोक मास्क घालत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोना फैलावत आहे, असंही ते म्हणाले.

शुक्लाप्रकरणी गृहविभागाला माहिती हवी असेल

यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. शुक्लांच्या बाबतीत गृहखात्याला काही माहिती हवी असेल. परंतु आता तपास सुरू आहे. त्यामुळे या घटनेवर बोलणं योग्य नाही. फोन टॅपिंग का झालं? कसं झालं? हे सर्वांना माहीत आहे. मुख्यसचिवांनीही त्याबाबत सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

नितेश राणेंवर टीका

सामंत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही टीका केली. कोविड सुरू झाल्यापासून काही लोक सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. त्यांना अशी टीका करणं म्हणजे मोठं कर्तृत्व वाटतं. पण काल मद्रास कोर्टाने निकाल दिल्याने अनेकांचे डोळे उघडले आहे. हायकोर्ट किंवा निवडणूक आयोग कुणामुळे चालतो हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलंच आहे. काहीही झालं तर शिवसेनेवर खापर फोडायचं हे योग्य नाही. ही योग्य वेळही नाही, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या वेळेस आपण नक्की बोलू. कुणी काय काम केलं आणि कुणी भ्रष्टाचार केला हे त्यावेळी सांगू. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांनी काम करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री जनतेचे पाईक म्हणून काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा. निवडणुकीच्या वेळी राजकारण करूच, असं ते म्हणाले. (maharashtra minister uday samant on mask wearing at home)

संबंधित बातम्या:

लसींच्या दरांबाबत केंद्र सरकार काय करतंय?, ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय?; सुप्रीम कोर्टाचा सवाल

मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर अजितदादांची सही; बुधवारी कॅबिनेटमध्ये निर्णय होणार?

नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांनी दंड थोपटले

(maharashtra minister uday samant on mask wearing at home)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.