Sameer Wankhede | चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी; तर प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशीही वानखेडेंनी काही वेळ चर्चा केली.

Sameer Wankhede | चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी; तर प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा
समीर वानखेडेंचे चैत्यभूमीवर अभिवादन
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 10:12 AM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुंबईत दादरमधील चैत्यभूमीवर (Dadar Chaityabhoomi) हजेरी लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6th December Mahaparinirvan Din) वानखेडेंनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि समीर वानखेडे यांच्यात चर्चा झाली. मात्र ही चर्चा नेमकी कशावर झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दुसरीकडे, वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली.

बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशीही वानखेडेंनी काही वेळ चर्चा केली. मात्र दोघांमध्ये कोणत्या विषयावर बोलण झालं, याचा तपशील मिळालेला नाही.

वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी

दुसरीकडे, अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले. त्याचवेळी समीर वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी विरोध केला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल चैत्यभूमीवर, अजित पवार, आदित्य ठाकरेंचीही हजेरी, दादा म्हणतात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.