Ekanth Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, आज राज्यपालांना पत्र देणार? 9 मोठ्या घडामोडी एका वाक्यात!

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ताबदलाच्या घडामोडींना वेग आला आहे.

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, आज राज्यपालांना पत्र देणार? 9 मोठ्या घडामोडी एका वाक्यात!
महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 7:45 AM

मुंबई : बंडखोर शिंदे (Ekanth Shinde News) गटाबाबत आता पुढे नेमकं काय घडतं, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Political Crisis) वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर आता चर्चांना उधाण आलेलं असतानाच एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात येणार असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुढील सुनावणी ही 11 जुलैला पार पडणार आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या 8 घडामोडी थोडक्यात आणि फटापट जाणून घेणार आहोत. नेमक्या त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात…

9 घडामोडी एका वाक्यात :

  1. राज्यातील सत्ताबदलाच्या घडामोडींना वेग, येत्या 48 तासांत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता
  2. शिंदे गट आज राज्यपालांना पत्र पाठवण्याची शक्यता, मविआचा पाठिंबा काढल्याच्या पत्राबरोबर शिंदे गटच शिवसेना असल्याचा करणार दावा
  3. महाराष्ट्रातल्या सत्ताकाऱणात लवकरच राज्यपालांची एंट्री, विश्वास दर्शक ठरावासंदर्भात कोश्यारी सरकारला विचारणा करु शकतात, सूत्रांची माहिती
  4. बंडखोर महाराष्ट्रात परतण्यापूर्वी महाराष्ट्रात निमलष्करी दल, राज्यपालांची विनंती केंद्र मान्य करण्याची शक्यता
  5. हे सुद्धा वाचा
  6. भाजप थेट राज्यपालांकडे अविश्वास प्रस्तावाची मागणी करणार नाही, मित्रपक्षातील नेता अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
  7. भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत, शिंदेंचा प्रस्ताव आल्यास विचार करु, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
  8. महाराष्ट्रावर फुटी-तुटीचे संकट भाजपमुळे, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, सामनातून शिंदे गटासह भाजपवर निशाणा
  9. भाजपवाले सर्व घोडे घेऊन गेले, तुम्हाला पाडलं नाही तर माझं नाव आदित्य सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान
  10. संजय राऊत आज ईडीच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता, जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचं राऊतांना समन्स

सोमवारी सुप्रीम कोर्टात काय घडलं?

बंडखोर शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात निलंबनाच्या नोटिसीसह विधानसभा उपाध्यक्षांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या शेवटी सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली. त्यानंतर या संबंधातली सर्व कागदपत्र आता सर्व पक्षकारांना कोर्टात सादर करावी लागणार आहेत. तर पुढील सुनावणी 11 जुलै रोजी करण्यात येईल, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बंडखोर 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाईही तूर्तास टळलीय. 11 जुलैपर्यंत आता महाराष्ट्रात पुन्हा रंगतदार राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.