Eknath Shinde : ठाकरे पिता-पुत्रांनी थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसोबत सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे, गजानन काळे यांचे ट्विट चर्चेत!

राज्यातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतायंत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. उद्या सकाळी एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल होती. यादरम्यान गजानन काळे यांचे ट्विट व्हायरल होत आहे, भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.

Eknath Shinde : ठाकरे पिता-पुत्रांनी थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसोबत सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे, गजानन काळे यांचे ट्विट चर्चेत!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 2:05 PM

मुंबई : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता बघायला मिळतयं. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) धोक्यात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सातत्याने बघायला मिळतंय. त्यामध्येच आता मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या ट्विटमध्ये जोरदार टोला मारण्यात आलायं. भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे, असं गजानन काळे यांनी म्हटलंय.

गजानन काळे यांचे ट्विट

गजानन काळे यांनी केली उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

राज्यातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतायंत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत आहे. उद्या सकाळी एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दाखल होती. यादरम्यान गजानन काळे यांचे ट्विट व्हायरल होत आहे, भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे, असे म्हटंले आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

उद्या फ्लोर टेस्ट होण्याची शक्यता

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे स्पष्ट आहे. कारण शिंदे गटाकडे 51 आमदार असल्याचा दावा स्वत: एकनाथ शिंदे यांनी केलायं. त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीच आहेत. उद्या 11 वाजता फ्लोर टेस्टला सुरुवात होईल, हे विशेष अधिवेशन बहुमत सिद्ध करण्यासाठीच बोलवण्यात आले आहे. 5 वाजेच्या आत फ्लोर टेस्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. हे विशेष अधिवेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये तहकूब केले जाणार नसल्याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.