Maharashtra Politics | निवडणुका होणार, असं घाबरवून आमदारांना धमक्या देताय? राऊतांच्या ट्विटवर नितेश राणेंचा पलटवार

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय.

Maharashtra Politics | निवडणुका होणार, असं घाबरवून आमदारांना धमक्या देताय? राऊतांच्या ट्विटवर नितेश राणेंचा पलटवार
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:49 PM

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… असं सूचक ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. राऊतांनी केलेलं हे वक्तव्य नेमकं कुणाला सूचना देतंय. एक तर सरकार बरखास्तीसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मनाची तयारी करावी की सरकारमध्ये असलेल्या इतर आमदारांसाठी हा इशारा आहे? चर्चा अनेक अंगांनी सुरु आहेत. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना याच वक्तव्यावरून सुनावलं आहे. निवडणुका होणार, असं सांगून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आमदारांना घाबरवत आहेत. धमक्या देत आहेत, असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. माझ्याकडे 40 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असा दावा शिंदेंनी केला आहे. हा दावा खरा असेल तर शिवसेनेचं संख्याबळ महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी अपुरं आहे.

नितेश राणेंचं ट्विट काय?

महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने, असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना प्रतिक्रिया दिलीय. ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी ? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरु होणार!

संजय राऊतांचं ट्विट काय?

महाविकास आघाडी सरकारला एकानंतर एक मोठे धक्के बसू लागल्यानंतर अखेर सरकार बरखास्त होणार, अशी मनाची तयारी शिवसेनेनंही केलेली दिसतेय. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना तशी प्रतिक्रियाही दिली. जास्तीत जास्त काय होऊ शकेल, सत्ता जाऊ शकेल… अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी अत्यंत सूचक ट्विट केलं.

रात्रीतून काय घडलं?

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.