महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
डॉ. प्रज्ञा सातव आणि राजीव सातव (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:57 AM

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहिसं दूर असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव या पती राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवतील हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. (Congress announces new executive, Rajiv Satav’s wife Dr. Pragya Satav  Appointment of as Vice President)

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 जणांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. आता त्यांच्याकडे राज्याचं शिस्तपालन कमिटीची धुरा सोपवण्यात आली आहे. यूपीएच्या काळात केंद्रात महत्वाची भूमिका बजावलेल्या आणि माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राज्यातील सत्तेत कुठलंही महत्वाचं पद नाही. दरम्यान, अमरजित मनहास यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला संधी देण्यात आली आहे. आशिष देशमुख यांना आणि धीरज देशमुख यांना जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी दिली गेलीय. त्याचबरोबर शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश पाटीलही जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळतील. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडेही जनरल सेक्रेटरी पद देण्यात आलंय. तरत सचिन गुंजाळ हे सचिवपदी असणार आहेत.

नव्या कार्यकारिणीत जातींचा समतोल

महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे आणि हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे.

पहिल्यांदाच 2 तृतियपंथियांना स्थान

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकरणीत पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आलं आहे. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्गासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देत सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केल्याचं दिसून येत आहे.

इतर बातम्या : 

जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना-भाजपचं ‘बॅनरवॉर’, कणकवलीत शिवसेनेचा बॅनरद्वारे इशारा!

आरोग्य विभागाची गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली! आता परीक्षेची तारीख काय?

Congress announces new executive, Rajiv Satav’s wife Dr. Pragya Satav  Appointment of as Vice President

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.