Maharashtra Nagar Panchayat Election 2021: 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु, 21 डिसेंबरला मतदान

सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Maharashtra Nagar Panchayat Election 2021: 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु, 21 डिसेंबरला मतदान
UPS Madan
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 8:08 AM

मुंबई: महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक निवडणुकींची रणधुमाळी संपली. सध्या विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. हे सुरु असतानाचं राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 105 नगरपंचायंतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नंगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे.

ओबीसी आरक्षण अध्यादेशानंतरची पहिली निवडणूक

स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर राज्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. ओबीसी संघटना आणि नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठराव विधानसभेत मंजूर होत असताना गोंधळ घातल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. राज्य सरकारनं त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, हायकोर्टानं याचिकेवरील सुनावणी सुरु असताना निवडणूक प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

आचार संहिता लागू

राज्यातील 32जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.

निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर अर्जांची छाननी : 8 डिसेंबर मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 निकाल : 22 डिसेंबर

जिल्हा निहाय निवडणूक लागलेल्या नगरपंचायती

  1. ठाणे- मुरबाड व शहापूर,
  2. पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा,
  3. रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),
  4. रत्नागिरी- मंडणगड, दापोली,
  5. सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,
  6. पुणे- देहू (नवनिर्मित),
  7. सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,
  8. सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,
  9. सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),
  10. नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,
  11. धुळे- साक्री,
  12. नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,
  13. अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी,
  14. जळगाव- बोदवड,
  15. औरंगाबाद- सोयगाव,
  16. जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),
  17. परभणी- पालम,
  18. बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,
  19. लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,
  20. उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.,
  21. नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,
  22. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,
  23. अमरावती- भातकुली, तिवसा,
  24. बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,
  25. यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी,
  26. वाशिम- मानोरा,
  27. नागपूर- हिंगणा, कुही,
  28. वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,
  29. भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,
  30. गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली,
  31. चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,
  32. गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

नगरपालिका पोटनिवडणूक

शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागांची पोटनिवडणूक देखील होणार आहे.

इतर बातम्या:

ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूलमध्ये, मेघालयात TMC प्रमुख विरोधी पक्ष

Election 2022: भाजप 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान राबवणार

Maharashtra State Election Commission announced election programme for 105 nagar panchayats voting on 21 December

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.