अतुल भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, मनिषा कांयदेंचा पलटवार
महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, असा घणाघात कायंदे यांनी केलाय.
मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, असा घणाघात कायंदे यांनी केलाय. (Manisha Kayande criticizes Atul Bhatkhalkar over Bhatkhalkar’s complaint against CM)
अतुल भातखळकर यांचे डोकं फिरलं आहे. त्याचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आला, त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचं बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचं कायंदे यांनी म्हटलंय.
‘भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहेत’
केंद्राच्याही अशा सूचना आहेत. अनेक राज्यांनी या सूचनेचं पालन करत कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत. ते कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार असल्याची टीका मनिषा कायंदे यांनी केली होती.
भातखळकरांचा आक्षेप काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.
या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असं भातखळकर म्हणाले.
इतर बातम्या :
सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार
Manisha Kayande criticizes Atul Bhatkhalkar over Bhatkhalkar’s complaint against CM