तर तुमचा राजकीय एन्काउटर करू; मनोज जरांगे यांचा अमित शाह यांना इशारा

धनगरचा जीआर काढणार आहेत. तो निघत असेल तर मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढायला सरकारची काहीच हरकत नसली पाहिजे. सरकार यात दुजाभाव करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो, दुसऱ्याचा नाही. हे योग्य नाही. ते आंदोलन कसे हाताळले, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात ठेवा. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यांचा अध्यादेश तुम्हाला निवडणुकीपूर्वीच काढावा लागणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

तर तुमचा राजकीय एन्काउटर करू; मनोज जरांगे यांचा अमित शाह यांना इशारा
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 1:41 PM

मराठ्यांचं आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, असा भाजप नेते अमित शाह यांनी म्हटलं होतं. अमित शाह यांच्या या विधानाचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शाह यांच्या या विधानावरून जरांगे यांनी शाह यांना थेट इशाराच दिला आहे. पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केलं हे आम्हाला माहीत आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केलं? दमणमध्ये काय केलं? अंदमानमध्ये काय केलं हे आम्हाला माहीत आहे. स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केलं हे आम्हाला माहीत आहे. पण माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर केले. भयानक केले. प्रमोद महाजनांनी काय कमी केलं होतं? अडवाणी कुठे कमी पडले होते? कुठे मुरली मनोहर जोशी कमी पडले? अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे कुठे कमी पडले होते? सुषमा स्वराज कुठे कमी पडल्या? तुम्ही या लोकांना का मागे पाडलं? तुम्ही गोवा, कर्नाटक, हरयाणा आणि तामिळनाडूत तेच केलं. तुम्ही वातावरण ढवळून काढण्यापर्यंत काम केलं. तोगडियांनी काम नाही केलं? अशोक सिंघलांनी काम नाही केलं? त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ का आणली? त्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही पक्ष आणि आंदोलन कसं हाताळतात हे सर्वांना माहीत आहे. मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून. तुम्ही कुणालाही सोडलं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जनता तुम्हाला वठणीवर आणेल

तुम्ही स्वत:ला महानबुद्धीचे समजता का? राजकीय एन्काउंटर करणं हे बुद्धीवादी काम नाही. सत्तेच्या बळावर काही करता येतं. तुम्ही चांगलं काम करणाऱ्यांनाही संपवलं. हे विचार जास्त काळ टिकत नाही. एक दिवस जनतेची खदखद बाहेर येते, तेव्हा लोक सत्तेच्या विरोधात जातात. ज्या यंत्रणांचा वापर केला. त्याही बाजूला होतात. तुमच्या गोळ्या आणि रणगाडेही संपतील. जनता तुम्हाला घरात घुसून वठणवीर आणेल. तुम्हाला अशा पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती आली आहे. त्याच पद्धतीने आमचं आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल. गुर्जर, पटेल यांचं आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? असा सवालही त्यांनी केला.

प्रत्येक राज्यात गुंड आहेत

आंदोलन हाताळण्याची ही पद्धत नाही. ही दादागिरीची पद्धत आहे. तुमची काम करण्याची पद्धत सर्व यंत्रणांना माहीत आहे. सर्व नाराज आहेत. वैतागले आहेत. या देशातील व्यावसायिकही तुमच्यावर नाराज आहेत. तुमची काम करण्याची खुन्नशी वृत्ती तुम्हाला संपवणार आहे. तुमचे गुजरातचेच व्यापारी परदेशात चालले आहेत. तुम्ही लोकांना जाळ्यात घुसायला लावू नका. मराठ्यांचं आंदोलन नीट हाताळा. तुम्हाला वाटतं गुंड पाळलेले आहेत. यंत्रणा मागे लावू. कुणालाही काही करू. हे विसरा. प्रत्येक राज्यात स्वाभिमान असणारे गुंड आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

जीआर काढावाच लागेल

मराठ्यांचं आंदोलन हाताळणार असं अमित शाह कोणत्या उद्देशाने बोलले ते पाहिलं नाही. त्यांचा उद्देश काय माहीत नाही. पण मराठ्यांचं आंदोलन हाताळणं एवढं सोपं नाही. अमित शाह हे शिर्डीला आले होते. तेव्हा आरक्षणाबाबत बोललो होतो. नागपूरला आले होते, तेव्हा बोलले नाही. साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. शाह साहेब तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार असाल तर तुम्हाला जाहीर सांगतो, अमित शाह आणि फडणवीस यांनाही सांगतो. तुम्हाला मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.