मनोज जरांगे मराठवाड्यात दिग्गजांना घरी बसवणार?, काही मतदारसंघांची नावे समोर; 46 जागांवर विचका?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वीच काही मतदारसंघांची नावे समोर आली आहेत. केज, मंठा, भोकरदन, फुलंब्री, कळमनुरी आणि परतूर या मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाच्या ताकदीनुसार उमेदवार निवडण्यावर भर दिला जात आहे. यामुळे प्रस्थापित उमेदवारांना आव्हान निर्माण झाले आहे.

मनोज जरांगे मराठवाड्यात दिग्गजांना घरी बसवणार?, काही मतदारसंघांची नावे समोर; 46 जागांवर विचका?
Manoj Jarange Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 1:35 PM

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानुसार अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत. पण एकाच मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या उमेदवारांबाबत मनोज जरांगे आज अंतिम फैसला करणार आहे. पण त्यापूर्वीच मराठवाड्यातील कोणत्या मतदारसंघात जरांगे उमेदवार देणार आहेत याची माहिती समोर आली आहे. काही मतदारसंघांची नावे समोर आल्याने या मतदारसंघातील प्रस्थापित उमेदवारांच्या काळजात धस्स झालं आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत उमेदवार आणि मतदारसंघ फायनल करण्याचं काम करत आहेत. मुस्लिम, मराठा आणि दलित नेतेही यावेळी उपस्थित आहेत. प्रत्येक मतदारसंघावर विचार सुरू आहे. आधी मराठवाड्यातील एकूण 46 मतदारसंघांवर चर्चा करण्यात येत आहे. त्यातही संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील मतदारसंघांवर आधी चर्चा केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात किती मुस्लिम आहेत, किती दलित आहेत आणि किती मराठा आहेत याची संख्या काढली जात आहेत. ज्या मतदारसंघात ज्या समाजाचे मतदार आणि ताकद जास्त त्या मतदारसंघात त्याच समाजातील उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे.

46 मतदारसंघात खेला होणार

मराठवाड्यात एकूण 46 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय तिन्ही समुदायाचे लोक पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने या 46 मतदारसंघांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी प्रस्थापित उमेदवारांना घरी बसावं लागणार असल्याचं चित्र आहे. ज्या मतदारसंघात तिन्ही समाजाची ताकद नाही, तिथे प्रस्थापित उमेदवारांना पाडण्यात येणार आहे. त्यानुसार रणनीती आखली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या मतदारसंघात उमेदवार

सध्या केज, मंठा, भोकरदन, फुलंब्री, कळमनुरी आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे. कळमनुरीत महायुतीचे संतोष बांगर उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे संतोष तारपे आहेत. बीडमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे लढत आहेत. तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे लढत आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बदनापूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.