आमच्या काळात जे विमा कंपन्यांचे ऑफिस फोडत होते ते आता सत्तेत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका
अनेक शेतकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. तसंच मदतीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची विनंतीही फडणवीसांना केली. लातूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.
लातूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. तसंच मदतीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची विनंतीही फडणवीसांना केली. लातूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over insurance companies)
सरकारी यंत्रणा आणि पीक विमान कंपनी यांच्यात समन्वय नाही. विम्याचं काम हे केंद्र सरकार असल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जातो. पण हे साफ खोटं आहे. विम्याचे नियम राज्य सरकार ठरवते. आंधळं दळतं आणि कुभं पीठ खातं अशी अवस्था आहे. आमच्या काळात जे लोक विमा कंपन्यांचे कार्यालय फोडत होते तेच आज सत्तेत बसलेत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. सरकार आणि यंत्रणा झोपलेली आहे. त्यांना जागं करण्यासाठी म्हणून आम्ही दौरा करत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय.
शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश – फडणवीस
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. तो सरकारनं समजून घ्यावा. सरकार जर तातडीने मदत करणार नसेल तर आमचे एक आमदार कोर्टात गेले आहेत. आम्हाला अंगावर तर जावंच लागेल ना, असा संतापही फडणवीसांनी व्यक्त केलाय. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जलयुक्तबद्दल राजकीय भाष्य नको. ज्यांनी दिलं ते कुणाच्या दबावाखाली दिले ते बघावं लागेल, असंही फडणवीस म्हणाले.
Painful tears… May farmers get help asap.#Maharashtra pic.twitter.com/FMiTaDLOiF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2021
‘दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या’
दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
Interacted with farmer families in Bhatkheda village in Latur district, earlier today. भातखेडा, लातूर येथे शेतकरी बांधवांसह संवाद साधला ..#Latur #Maharashtra #Marathwada #heavyrain #flood pic.twitter.com/q1EMieaxb8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2021
दानवेंकडून उद्धव ठाकरेंना ‘त्या’ वक्तव्याची आठवण
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. त्यावेळी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत असताना पंचनामे कशाचे करता, मदत जाहीर करा, अशी मागणी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंचनामे न करताना थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.
काळजी करू नका, सारे मिळून सोबत लढू ! आपल्या बळीराजाला मदत मिळवून देऊ !#Nanded #MaharashtraRains #Maharashtra #Farmers @mipravindarekar pic.twitter.com/iYIIvRGOui
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2021
इतर बातम्या :
शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं; आमदार महोदयांच्या भावना काय?
बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा
Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over insurance companies