म्हणून काँग्रेस दलितांना बळीचा बकरा बनवतंय; खरगे यांच्या निवडीवरून मायावती यांचा हल्लाबोल
मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. खरगे हे कर्नाटकातून येतात. ते दलित समाजातील आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस नेते शशी थरुर उभे होते.
लखनऊ: काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) विजयी झाले आहेत. या विजयामुळे खरगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच बसपाच्या अध्यक्षा मायावती (mayawati) यांनी मात्र काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने (congress) नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. आता काँग्रेसचा वाईट काळ सुरू आहे. त्यामुळे या काळात दलितांना पुढे करण्याची काँग्रेसला आठवण झाली आहे. काँग्रेस दलितांना बळीचा बकरा बनवत आहेत, अशी टीका मायावती यांनी केली आहे.
मायावती यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. काँग्रेसने दलित आणि शोषितांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वंचित समाजाचा नेहमीच तिरस्कार केला. याला इतिहास साक्षी आहे. काँग्रेसला कधीच त्यांच्या चांगल्या दिवसात दलितांच्या सन्मानाची आठवण झाली नाही. मात्र, वाईट काळात दलितांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असं मायावती यांनी म्हटलं आहे.
आपल्या चांगल्या काळात काँग्रेसने नेहमीच गैर दलितांना पुढे केले. त्यांच्यासाठी सर्व काही केलं. त्यावेळी त्यांना कधीच दलितांची आठवण झाली नाही. मात्र, आता पडता काळ आल्याने त्यांना दलितांची आठवण आली आहे. हा छळ किंवा छद्म राजकारण नाही का? काँग्रेसचं दलितांवरील हेच वास्तव प्रेम आहे का? असा सवाल आता लोक करू लागले आहेत, असंही त्या म्हणाल्या.
1. कांग्रेस का इतिहास गवाह है कि इन्होंने दलितों व उपेक्षितों के मसीहा परमपूज्य बाबा साहेब डा भीमराव अम्बेडकर व इनके समाज की हमेशा उपेक्षा/तिरस्कार किया। इस पार्टी को अपने अच्छे दिनों में दलितों की सुरक्षा व सम्मान की याद नहीं आती बल्कि बुरे दिनों में इनको बलि का बकरा बनाते हैं।
— Mayawati (@Mayawati) October 20, 2022
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. खरगे हे कर्नाटकातून येतात. ते दलित समाजातील आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस नेते शशी थरुर उभे होते. शशी थरुर यांना या निवडणुकीत 6 हजार 825 मते मिळाली. तर खरगे यांना 7 हजार 897 मते मिळाली. थरुर यांच्या खात्यात 1072 मते आली.
या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसला तब्बल 24 वर्षानंतर गैर काँग्रेसी अध्यक्ष मिळाला आहे. त्यापूर्वी सीताराम केसरी हे गैर काँग्रेसी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी केवळ सहावेळा निवडणूक झाली आहे.