meera borwankar | जागेच्या विक्रीस नकार दिल्यावर त्यांनी नकाशा भिरकावला…अजित पवार यांच्यावर सनसनाटी आरोप

Meera Borwankar on Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अडचणीत आले आहे. पुणे येथील माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकामुळे अजित पवार यांच्या अडचण वाढली आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर...

meera borwankar | जागेच्या विक्रीस नकार दिल्यावर त्यांनी नकाशा भिरकावला...अजित पवार यांच्यावर सनसनाटी आरोप
Meera Borwankar and Ajit PawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 2:40 PM

पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 2010 मधील एका प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. पुणे येथील येरवडा भागात असलेल्या पोलिसांच्या तीन एकर जमिनीचे हे प्रकरण समोर आले आहे. तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून हे प्रकरण उघड केले आहे. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी सरळ अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु पुण्याचे पालकमंत्री ‘दादा’ असे म्हटले आहे. हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे.

काय केला आहे अजित पवार यांच्यावर आरोप

‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरवर दिली. पुस्तकात त्यांनी थेट अजित पवार यांचे घेतलेले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे म्हटले आहे. दरम्यान अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. लिलावाच्या निर्णयाला आपण त्यावेळी विरोध केल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान या पुस्तकानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अजित पवार यांना घेरण्यात आले आहे.

काय केला आहे पुस्तकात दावा

‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे की, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्याचा आढावा घेतला. एके दिवशी मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की, पुण्याचे पालकमंत्र्यांना तुम्हाला भेटायचे आहे. त्यांना तुम्ही एकदा भेटा. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांनी नकाशा भिरकवला

मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा त्यांच्याकडे होता. त्यांनी मला सांगितले की, या जागेचा लिलाव झाला आहे. जास्त बोली लावणाऱ्यांसोबत तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना म्हटले, येरवडा पुणे येथील मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात अशी जागा मिळणार नाही. तसेच मी नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. पण त्या मंत्र्यांनी माझे काहीच ऐकले नाही आणि जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला, असा दावा पुस्तकात केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.