AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Chavan | मुंबई गोवा महामार्गाचे काम 2023 पर्यंत पुर्ण होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मोठी घोषणा…

यासर्व प्रकरणावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, गणेशोत्सवाच्या अगोदर 25 आॅगस्टपर्यंत रस्तावरील सर्व खड्डे तातडीने बुजवले जाणार आहेत. मुंबई गोवा महामार्ग 2023 पर्यंत पुर्ण करू असेही आवाहन रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे.

Ravindra Chavan | मुंबई गोवा महामार्गाचे काम 2023 पर्यंत पुर्ण होणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मोठी घोषणा...
| Updated on: Aug 18, 2022 | 12:20 PM
Share

मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचे (Highway) तीन तेरा वाजले आहेत. कशेडी घाटात मोठं मोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. गोवा महामार्गवरील काम अजूनही पूर्ण न झाल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जातोयं. त्यामध्ये आता पावसाळा (Rain) सुरू असल्याने खड्डयांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. मात्र, आता मुंबई गोवा महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे.

कशेडी घाटात मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे चार ते पाच तास अधिक वेळ वाहनचालकांना लागतोयं. तसेच अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झालीयं. यावर आज विधानसभेमध्ये चर्चा झाली. मुंबई गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झाले नाही का असा प्रश्न भाजपने शिवसेनेच्या आमदारांना विचारला. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, हे गेल्या 12 वर्षातील चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचे अपयश आहे का असा प्रतिसवाल केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली मोठी घोषणा

यासर्व प्रकरणावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, गणेशोत्सवाच्या अगोदर 25 आॅगस्टपर्यंत रस्तावरील सर्व खड्डे तातडीने बुजवले जाणार आहेत. मुंबई गोवा महामार्ग 2023 पर्यंत पुर्ण करू असेही आवाहन रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे. आरआयबीनी रस्त्यावरील खड्डे बुजावयाला हवे होते असेही सांगण्यात आले आहे. आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम 2023 पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने काम लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.