आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघातामागे घातपाताची शक्यता

अपघातसंदर्भात योगेश कदम यांनी हा अपघात घातपात असल्याची शक्यता नाकारली नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव...

आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघातामागे घातपाताची शक्यता
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 9:46 AM

रत्नागिरी : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) अपघाताची सत्र सुरु आहे. राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीय. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचाही प्रवास करताना गाडीला अपघात झाला. त्यानंतर आता आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

योगेश कदम यांना Y+ सुरक्षा आहे. त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी होती. अपघात झालेल्या ठिकाणी यापुर्वी अनेकदा अपघात झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहे. त्यानंतर दखल घेतली जात नाही. योगेश कदम अपघातातून वाचले नसते तर काही उपययोजना सुरु झाली असती, असा आरोपच आमदार योगेश कदम यांनी केला. हिवाळी अधिवेशात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्माक असल्याचे सांगितले.

घातपाताची व्यक्त केली शक्यता दरम्यान या अपघातसंदर्भात योगेश कदम यांनी हा अपघात घातपात असल्याची शक्यता नाकारली नाही. अपघाताचा पॅटन साधारण अपघातासारखा नाही. माझ्या गाडीच्या मागेपुढे पोलिसांची गाडी असताना डप्परने धडक दिली. त्यामुळे शंका घेण्यास मोठा वाव असल्याचे कदम यांनी सांगितले. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांकडे अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी टीव्ही९ शी बोलतांना सांगितले.

सुषमा अंधारे यांचा आरोप माझा घातपात होऊ शकतो, अशी भीती सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. ते तु्म्हाला डायरेक्ट शूट करण्याऐवजी तुमचा अपघातसुद्धा घडवून आणू शकतात. काहीही होऊ शकतं. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत भाजपवर आरोप केलेत. माझ्याविरोधात कारवाईसाठी काही नाही. त्यामुळं अपघात घडवून मला संपवलं जाऊ शकते, अशी भीती सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अधिकारीचं ही माहिती देत असल्याचा दावा अंधारे यांचा आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.